लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी आपल्या पालकांकडून शाळेत जाण्यासाठी त्यांनी कसा संघर्ष केला याचे अनेक किस्से ऐकले असतील. कोणी कित्येक किलोमीटर अंतर चालत जात असे तर कोणाला नदी ओलांडून शाळेत जावे लागत असे. पण उत्तराखंडच्या मुनसियारी गावातील काही विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती फारशी बदललेली नाही. तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या प्रगतीमुळे रस्ते, पुल बांधणे पुर्वीसारखे अवघड राहिलेले नाही तरीही आजही अनेक विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून नदी ओलांडून शाळेत जाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
नदी ओलांडून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीनींनी काय केले पाहा!
पत्रकार त्रिभुवन चौहान यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नववीतील दोन विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी एका दोरखंडाला बांधलेल्या ट्रॉलीचा वापर करून नदी ओलांडताना दिसत आहेत. कोणाच्याही मदतीशिवाय त्या स्वतःला एका बाजूने दोरखंड ओढत आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला जात आहे. सत्य परिस्थिती मांडताना चौहान म्हणतात, ” असा होईल का विकास? आज २०२५मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ(मुलगी वाचवा मुलीला शिकवा) या योजनेची ही व्यवस्था आहे का?
ब्रूट इंडियाने नंतर पुन्हा पोस्ट केलेल्या या फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की,या भागाला जोडणारा पूल २०१३ मध्ये नष्ट झाला होता आणि तो अद्याप पुन्हा बांधण्यात आलेला नाही. एक दशकापूर्वी, दोरखंड बांधून ट्रॉलीची सेवा सुरू करण्यात आली होत्या आणि जवळजवळ ७० दुर्गम गावांना बाहेरील जगाशी जोडण्याचे ते एकमेव साधन राहिले आहे. या व्हिडिओमुळे ग्रामीण पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की,”तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या प्रगतीच्या युगात अशा परिस्थिती का कायम आहेत.”
या व्हिडिओला ऑनलाइन प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे, सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांनी कमेंट सेक्शन भरले आहे.
Viral Video पाहून अंगावर येईल काटा
एका वापरकर्त्याने लिहिले की, “राजकारण्याना त्यांच्या सोयीसाठी हेलिकॉप्टर आणि लक्झरी वाहने खरेदी करतात आणि लाखो खर्च करतात पण काही लाखांमध्ये ते पूल बांधू इच्छित नाहीत. यावरून सामान्य जनतेसाठी ते किती जबाबदार आहेत याचा हेतू दिसून येतो! विशेषतः उत्तराखंडमध्ये सत्ताधारी सरकारचा लोककल्याणकारी हेतू पाहणे खूप कठीण आहे.”
दुसऱ्या एका युजरने लिहिले, “जागरूकतेसाठी हा व्हिडिओ बनवणाऱ्याचे आभार….. आणि आता सरकार कुठे आहे? २०२५ मध्ये ही परिस्थिती असू शकत नाही…. या परिस्थितीशिवाय ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना परिस्थिती देखील रोखू शकत नाही. पहाडी मुलींनो, तुम्हाला खूप प्रेम!”
एका युजरने लिहिले, “आता तुम्हाला कळले की, तुमचे पालक खोटे बोलत नव्हते,” आणि दुसऱ्याने कमेंट केली, “कल्पना करा की ते त्यांच्या मुलांना कोणत्या गोष्टी सांगतील.”