सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ पाहून धक्काच बसतो. अनेकदा शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत. शिकण्याच्या वयात ही मुले-मुली चुकीच्या मार्गावर जात आहेत. सगळ्याचं भान विसरून थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात सरकारी महाविद्यालयात शिक्षकांसमोर बिअरची बॉटल उघडून बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

मध्य प्रदेशातील मौगंज येथील एका सरकारी महाविद्यालयाच्या वर्गात वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी केक कापत आहे तर दुसरा बिअरची बॉटल उघडत असल्याचे दिसून येते. व्हिडीओमध्ये वर्गात शिक्षिकादेखील उपस्थित असल्याचं दिसून येतंय.

सरकारी हनुमान महाविद्यालयाच्या वर्गात घडलेल्या या घटनेवर जनतेकडून तीव्र टीका होत आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. व्हिडीओखालील कमेंट्सवरून असे दिसून येते की, लोक या घटनेमुळे संतापले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी केक वर्गात कापताना दिसत आहे, तर दुसरा विद्यार्थी वर्गात बिअरची बाटली उघडत आहे. तसंच या सेलिब्रेशनमध्ये शिक्षिकादेखील उपस्थित असल्याचं दिसून येतंय, ज्या हस्तक्षेप न करता त्यांचा हा प्रकार पाहत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. अनेकांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, शैक्षणिक जागेच्या गैरवापराबद्दल निराशा आणि चिंता वाढत आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे, तसेच कार्यक्रमादरम्यान शिस्तीचा अभाव आणि शिक्षिकेच्या उपस्थितीवर टीका केली आहे. काहींनी महाविद्यालय प्रशासन आणि प्राचार्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे, हे शैक्षणिक संस्थेसाठी कलंक असल्याचे म्हटले आहे.

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या महाविद्यालयाच्या व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई करावी. ज्ञानाच्या मंदिरात असे असभ्य वर्तन सहन केले जाणार नाही, कठोर कारवाई झाली पाहिजे.” तर दुसऱ्याने “सोशल मीडियाचे दुष्परिणाम” अशी कमेंट केली; तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “शिक्षणाची थट्टा करून ठेवलीय यांनी.”