Students Fight Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा शाळेतील कॉलेजमधील व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात शिक्षकांचा डान्स तर मुलांची शिकवणी, कधी मजेशीर कविता तर कधी विद्यार्थ्यांची मस्ती असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, अनेकदा विद्यार्थ्यांच्या मारामारीचे व्हिडीओही व्हायरल होताना आपण पाहिले असतील. कॉलेजमध्ये मजा-मस्करीत मित्र-मैत्रिणींमध्ये अनेकदा वाद होतात. काही वाद सहज मिटतात, पण काही इतक्या टोकाला जातात की ते हाणामारीपर्यंत पोहोचतात.

शाळा, कॉलेज, विद्यापीठ हे विद्येचे मंदिर मानले जाते. परंतु, आजकाल अभ्यास सोडून विद्यार्थी अशा ठिकाणीही आपलीच मनमानी करू लागले आहेत. भरवर्गात तर कधी वर्गाबाहेर क्षुल्लक गोष्टींवरून दादागिरी करून भांडण आणि मारामारी करू लागले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय, ज्यामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसून येते. विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. हे भांडण एका मैत्रिणीवरून झाल्याचं बोललं जात आहे.

sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Shocking video delhi two girls fight in college video viral on social media
“अगं सोड जीव जाईल तिचा”, भर कॉलेजमध्ये तरुणींमध्ये कपडे फाटेपर्यंत हाणामारी; VIDEO पाहून धक्का बसेल
pimpri teacher beaten up with hammer
पिंपरी : लिफ्टमध्ये घुसून शिक्षिकेला हातोडीने मारहाण
Noida officials ignore elderly man, get stand-up punishment from CEO Watch Viral video
कर्मचाऱ्यांनी केली ही चूक, अधिकाऱ्याने सर्वांना दिली ‘उभे राहण्याची शिक्षा, नक्की घडलं तरी काय? Viral Video पाहून आठवतील शाळेचे दिवस

हेही वाचा… “देशी दारू अशी चढली की…”, सरकत्या जिन्यांवर काकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओत कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थ्यांचे गट एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. या दोन गटांत जोरदार मारामारी सुरू आहे. एकमेकांची कॉलर पकडून तर जमीनीवर लोळवून विद्यार्थी मारामारी करत आहेत. कॅम्पसमध्ये ही मारामारी सुरू असून आजूबाजूने अनेक जण जाताना दिसतायत, पण कोणीच यांची मारामारी थांबवण्याचा प्रयत्न करत नाही.

हा व्हिडीओ @AmarSai91829221 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “नोएडा :- एमिटी युनिव्हर्सिटीची दुरवस्था, गौतम बुद्ध नगर येथील प्रसिद्ध विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आले, विद्यापीठाला बनवले कुस्तीचा आखाडा, परस्पर वादातून दोन विद्यार्थी गटात जोरदार हाणामारी, भांडणाचा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल.” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आले आहे. “एका मुलीसाठी एकमेकांचा जीव घेतील” अशाप्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडीओला आल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तीन विद्यार्थांना अटक केल्याचे वृत्त आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठानेही कारवाई केली आणि भांडणात सहभागी असलेल्या तीनही विद्यार्थ्यांना निलंबित केले. प्रॉक्टोरियल बोर्डाने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा… ग्राहकांच्या जीवाशी खेळ! मिठाईप्रेमींनो सावधान, तुमची मिठाई उंदीर खातोय; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

पोलिसांनी सांगितले की, “भांडणाची घटना एमिटी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये, वर्गाबाहेरील गॅलरीत घडली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत, भांडणात सहभागी असलेल्या तीन विद्यार्थ्यांना अटक केली असून, कायदेशीर कारवाई सुरू आहे. तीनही विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे आणि प्रॉक्टोरियल बोर्ड या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहे.”

Story img Loader