सध्या सोशल मीडियावर एक हॉस्टेलमधील एक अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे; जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या हॉस्टेलमधील जेवणात चक्क एक जिवंत उंदीर तरंगताना दिसत आहे. हा प्रकार पाहून हॉस्टेलमधील जेवण खाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही धक्काच बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हॉस्टेलमधील जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला आहे.
चटणीत सापडला जिवंत उंदीर
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (JNTUH)च्या हॉस्टेलमधील असल्याचे म्हटले जात आहे. या हॉस्टेलमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये हे जेवण दिले जात होते. यावेळी तेथील एका चटणीच्या भांड्यात चक्क जिवंत उंदीर तरंगताना दिसला.
चटणीने भरलेल्या भांड्यात जिवंत उंदीर बाहेर येण्यासाठी उडी मारत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ ८ जुलै रोजीचा असल्याचे समोर आले आहे.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक भांड्यात पिवळी चटणी ठेवली आहे. त्यामध्ये एक लहान उंदीर तरंगताना दिसत आहे. उंदीर भांड्यातून बाहेर येण्यासाठी उड्या मारतोय. यावेळी काही विद्यार्थी त्याचा व्हिडीओ बनवीत आहेत. मेसमधील जेवणात सापडलेला उंदीर पाहून अनेकांनी हॉस्टेल प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हॉस्टेलच्या मेसमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा
हॉस्टेलच्या मेसमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा किळसवाणा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून युजर्सने तीव्र संताप व्यक्त करीत आहे. एका युजरने लिहिले की, “उंदरासाठी हे स्विमिंग पूलसारखे आहे. गंमत राहू हे बाजूला, पण प्रशासनाने चौकशी करत कामात कसूर करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हैदराबादमधील ८० टक्के रेस्टॉरंटमध्ये अशाच प्रकारे जेवण बनवले जाते.
अन्य एका युजरने लिहिले की, चटणीत उंदीर सापडणे धोकादायक आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नये. यावर आणखी एका युजरने तक्रार केली की, जर जेवणाच्या दर्जाबाबत कोणी तक्रार केली, तर त्याला हॉस्टेल सोडण्यास सांगितले जाते. पण जेव्हा हॉस्टेल सोडून जाण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा अनामत रक्कम दिली जात नाही. जर हॉस्टेलमध्ये अशा प्रकारे जेवण दिले जात असेल, तर विद्यार्थ्यांनी कुठे जायचे? रोज बाहेर जाऊन खाऊ शकत नाही.