राजस्थानमधल्या एका आदिवासी शाळेत विद्यार्थ्यांकडून मसाज करून घेत असलेल्या शिक्षकाचा व्हिडिओ समोर आला आहे. राजस्थानमधल्या जशपूर जिल्ह्यातील एका शाळेमधला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये शाळेतला एक शिक्षक जमिनीवर उताणा झोपला आहे आणि शाळेतील काही विद्यार्थी त्यांचे पाय आणि पाठ चेपून देत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शाळेतल्या गरीब आदिवासी मुलांचे कशा प्रकारे शोषण करून घेतले जात असल्याचे समोर आले आहे. शिक्षकांचे पाठ आणि पाय चेपून देतानाचा प्रकार कोणीतरी मोबाईलमध्ये शूट केला, सोशल मिडियावर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केल्यानंतर शाळा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत शिक्षकास बडतर्फ केले आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार हे प्रकरण या शाळेत महिन्याभरापूर्वी घडले आहे. शाळेच्या स्टाफ रूमध्ये खुलेआम हा प्रकार सुरु होता. अनुज मिंज असे या शिक्षकाचे नाव असून शाळेतील दोन तीन विद्यार्थांकडून त्यांने आपल्या पायांचे तळवे आणि पाठ चेपून घेतली. हे मसाज प्रकरण या शिक्षकांच्या अंगलगट आल्यानंतर त्याने आपण आजारी असल्याचा दावा केला आहे. मी आजारी असून त्यादिवशी मला ताप होता आणि अंग ठणकत होतं. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी स्वखुशीने माझी सेवा केली असे स्पष्टीकरण त्यांने दिले. तसेच आपण माझे अंग चेपून देण्यासाठी कोणतीही बळजबरी या मुलांवर केली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शाळा प्रशासनाला विचारले असता त्यांनी या शिक्षकावर योग्य ती कारवाई केली असल्याचे सांगितले.

Story img Loader