Viral Video: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, या दिवसांत सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. या व्हिडीओंमध्ये कधी अनेक लोक पावसाचा आनंद लुटताना दिसतात, रील्स बनविताना दिसतात. पण, मनोरंजनाव्यतिरिक्त बऱ्याचदा पावसाळ्यात अनेकदा थरकाप उडविणाऱ्या घटनादेखील घडतात. काही दिवसांपूर्वी लोणावळ्यातील भुशी डॅम या धबधब्यावर मौजमजेसाठी गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. हा सोशल मीडियावरील व्हिडीओ खूप चर्चेत आला होता. अशा प्रकारच्या विविध दुर्घटना पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी घडतात. पण, फरक फक्त इतकाच असतो की, काही जण धबधब्यावर मौजमजा करण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालतात; तर काही जणांना मजबुरी म्हणून पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. आता अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात काही शालेय विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत.
शेवटी शिक्षण महत्त्वाचं! शाळेत जाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “यांच्या इच्छाशक्तीसाठी…”
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाणी साठलेल्या एका ओढ्यातून काही शालेय विद्यार्थी जाताना दिसत आहेत. यावेळी ते ओढ्याच्या पलीकडे जाण्यासाठी एका बोटीचा वापर करतात.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2024 at 17:04 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students life threatening journey commute to school after watching the video netizens said children are super sap