Zilla Parishad School Video: हल्ली सोशल मीडियावर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यातील काही व्हिडीओंमध्ये शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसह सुंदर नृत्य करताना दिसतात, तर कधी कविता म्हणताना दिसतात; तर कधी विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. त्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. असे सुंदर व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आपल्या शाळेतील सुंदर दिवस आठवतात. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक पद्धत पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

शहरातील मोठमोठ्या शाळांतील शिक्षक असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक असोत; प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते. गावाकडच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाबरोबर इतर आवड निर्माण करणाऱ्या गोष्टीही शिकवल्या जातात. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शिक्षकाने मुलांना पाढे पाठ व्हावे आणि पाढ्यांचा कंटाळा येऊ नये म्हणून एक युक्ती लढवली आहे, ज्यामुळे मुलं आनंदाने पाढे म्हणताना दिसत आहेत.

Lalbaugha raja viral video: Old Woman Denied Ganpati Darshan At Lalbaugcha Raja Due To Long Queue Video
आजीनं बाप्पाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्याचे धरले पाय, पण…, लालबागमधील संतापजनक VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची ?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण

काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बागेमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी रांगेत उभे राहिले असून यावेळी ते एकत्र पाढे म्हणताना दिसत आहेत. शिवाय पाढे म्हणता म्हणता ते लेझीमही खेळत आहेत. या व्हिडीओवर असं लिहिण्यात आलंय की, “शिक्षण, व्यायाम, कला, समन्वय आणि आनंद एकाच वेळी…” तसेच कॅप्शनमध्ये, “उपक्रमातून, कृतीमधून, खेळामधून मुलं खूप आवडीने शिकतात. इयत्ता पहिलीची चिमुकली लेझीमवर बे चा पाढा म्हणताना अक्षरशः बेभान झाले आहेत. त्यांचा उत्साह व चेहऱ्यावरचा आनंद खूप समाधान देऊन गेला”, असे लिहिण्यात आले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lahuborate या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘गावरान तडका…’ शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी धरला हलगीच्या तालावर ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरातील हलगी डान्स…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “Zp शाळा जीवनातली सर्वात भारी शाळा असते. आयुष्यातील सुवर्ण दिवस असतात”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “शिकवण्याची व शिकण्याची नवीन दिशा.. जी बदलेल नवीन पिढीची दशा”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “लयभारी सर”; तर इतर युजर्स शिक्षकांचे कौतुक करत आहेत.