आपण सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडिओ बघत असतो. यामध्ये आपल्याला रोज काही ना काही नवनवीन आणि अतरंगी गोष्टी बघायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ कधी आपल्याला आनंदाचा झटका देतात तर कधी आपले डोळे आश्चर्याने चक्रावून जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाळेचे विद्यार्थी आपल्या वर्गशिक्षकांसामोर ‘औरत चालीसा’ गातांना दिसून येतात. हा हास्यास्पद प्रकार पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
काय आहे ‘या’ व्हिडीओमध्ये ?
हा व्हिडीओ KhadedaHobe नावाच्या ट्विटर यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुले महिला शिक्षिकेसमोर गाणे गाताना दिसत आहेत. ते विद्यार्थी महिलांच्या स्वभावाला स्मित चिमटा घेत सुरात ‘औरत चालीसा’ सादर करतात. त्यांचे ही चालीसा ऐकून महिला शिक्षकांना हसू आवरता येत नसल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
(आणखी वाचा : बेल्जियमची मुलगी ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात वेडी; भारतात आली आणि मग…)
काय म्हणाले नेटकरी ?
विद्यार्थ्यांनी गायलेली ‘औरत चालीसा’ सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हिडिओला जवळपास २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून त्याला दर्शकांनी मज्जेशीर पसंती दिली आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यावर एक दर्शक म्हणतो की, यामुळे महिलांना अधिक शक्ती मिळेल. तर दुसरा म्हणतो महिलांना हे दुखविण्यासाठी नसून ही खरी परिस्थिती आहे, अशी देखील मजेशीर प्रतिक्रीया नोंदविली आहे.