Viral Video : सोशल मीडियावर अनेक मजेशीर फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही पोस्ट इतक्या मजेशीर असतात की हसू आवरत नाही. तुम्ही अनेकदा परिक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुद्धा व्हायरल होताना पाहिल्या असेल. सध्या असाच एक परिक्षेतील पेपर व्हायरल होत आहे. या पेपरमध्ये विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारली आहे. विद्यार्थ्याने ज्या पद्धतीने या प्रश्नाची उत्तरे दिली आहे ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना तर हसू आवरणार नाही.

व्हायरल पोस्ट

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये एक परिक्षेचा पेपर दिसेल. या पेपरमध्ये तुम्हाला तीन प्रश्न दिसतील. या तीन प्रश्नाचे विद्यार्थ्याने खूप सुंदर उत्तरे दिली आहे. पेपरमध्ये पहिला प्रश्न विचारला आहे की तुमचा हिरो कोण? त्यावर विद्यार्थ्याने लिहिलेय, “DAD” म्हणजेच वडील. तर दुसरा प्रश्न विचारला आहेकी तुम्हाला ते का हिरो वाटतात? त्यावर विद्यार्थ्याने लिहिलेय, “ते खूप धाडसी आहे.” आणि तिसरा प्रश्न विचारला आहे की अशी काही गोष्टी की ज्याला तुमचा हिरो घाबरतो? त्यावर विद्याथ्याने जे उत्तर लिहिलेय ते पाहून तुम्हाला हसू आवरणा नाही. विद्यार्थ्याने त्यावर आईला घाबरतो असे लिहिलेय. सध्या हा पेपर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुलांसाठी प्रत्येक वडिल हिरो असतात. असाच वडिलांना हिरो समजणाऱ्या विद्यार्थ्याने पेपरात उत्तरे लिहिली आहे. मुले हे निरागस असतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
a brother Holding a cockroach in his hand showed fear to his sister
झुरळ हातात पकडून बहि‍णीला दाखवली भीती; तुमच्या भावाने तुमच्याबरोबर कधी असं केलं का? पाहा Viral Video
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : बापरे! सापाच्या विषाचा शरीरातील रक्तावर कसा परिणाम होतो? पाहा धक्कादायक

netflixnmovies या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर लिहितो, “लहान मुले खूप हूशार असतात. त्यांना माहिती आहे की कोण बॉस आहे” एका युजरने लिहिलेय, “भाऊ खूप प्रामाणिक आहे” तर एका युजरने लिहिलेय, “या विद्यार्थ्याला माहिती आहे की जीवन कसं चालतं? आणखी एका युजरने लिहिलेय, “हा तर धाडसी आणि हूशार मुलगा आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. अनेकांना हे उत्तरे आवडली आहे.