UPSC Success story: भावी प्रशासक घडविणाऱ्या स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं तरुणांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. प्रशासकीय अधिकारीपद आणि त्यातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणारी मुलं या क्षेत्राकडे वळत आहेत. मात्र या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बहुसंख्येने ग्रामीण क्षेत्रातून शहरात येणाऱ्या मुलांना नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं? स्वत:ला या कठीण अभ्यासासाठी तयार करत, उत्तीर्ण होणं या सगळय़ामुळे अनेकदा या मुलांवर ताण येत राहतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र यातूनही कितीतरी वेळा अपयश पचवून काहीजण यश खेचून आणतात. मात्र सतत अभ्यास करुनही जेव्हा अपयश येत तेव्हा मात्र विद्यार्थी निराश होतात. अशावेळी काहीतरी प्रेरणा किंवा स्वप्न डोळ्यासमोर असलं की विद्यार्थी अपयशानंतरही पुन्हा जोमानं तयारीला लागतात. तुम्ही स्पर्धा परिक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांच्या स्टडी डेबल किंवा अभ्यासाच्या जागी अशीच काही मोटीवेशनल वाक्य पाहायला मिळतात. ही वाक्य डोळ्यासमोर असल्यानं कधीही माघार घ्यायचा विचार आला किंवा अभ्यासाचा कंटाळा आला तर हेच वाक्य पुन्हा जोमानं अभ्यास करायला प्रेरणा देतात. असंच एक वाक्य जे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या टेबलसमोर लावलं आहे. हे वाक्य वाचून तुमच्याही अंगावर काटा येईल.

“तो झाला तु कसं काय राहिला? हे वाक्य खूप त्रास देत राहील.”

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, अभ्यासाच्या टेबलसमोर या विद्यार्थ्यानं एक ओळ लिहली आहे. “तो झाला तु कसं काय राहिला? हे वाक्य खूप त्रास देत राहील.” म्हणजेच तुमच्या सोबतचा जोडीदार अधिकारी झाला आणि तुम्ही मागे राहिला तर सगळे एकच प्रश्न विचारतील तो म्हणजे “तो झाला तु कसं काय राहिला?” स्पर्धा परिक्षेची तयारी करताना कुणी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारतं तर काहींना बरेच प्रयत्न करावे लागतात. अशावेळी मित्र, नातेवाईक, घरचे आणि समाज प्रश्न विचारतात की तुच्या बरोबरचा झाला आणि तू कसं काय राहिला? अशावेळी फार त्रास होतो. त्यामळे अशी वेळ येऊ नये म्हणून आजच मेहनत घे असा याचा उद्देश आहे.

पाहा पोस्ट

हेही वाचा >> उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकरांचा धमाका; तीन लाख मतांनी विजयी, आईच्या भेटीचा भावनिक VIDEO व्हायरल

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होणे, पोलिसी गोल टोपी मिरवणे किंवा रुबाबात गाडीत फिरण्याचे स्वप्न ठेवणे काही चूक नाही. मात्र, अनेकदा असे होते की, आपण आपली क्षमता आणि गुणवत्ता याचा ताळमेळ न बसवता या फंदात पडून आपले आयुष्य वाया घालवतो. काहींना यश मिळते. मात्र, ते खूप मोजके असतात. तर, अनेक गुणवत्तापूर्ण मंडळी आपला महत्वाचा वेळ या चक्रव्यूहात खर्ची घालतात. माध्यमांच्या बातम्या आणि सामाजिक स्टेट्स यामुळे हे चक्रव्यूह आणखी घट्ट होत आहे. आपण स्वतः निर्णय घेतला असेल व मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल. संयम खुप लागतो. कारण शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे जो टिकेल तोच जिंकेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Study desk photo of upsc student goes viral on social media upsc success story srk