Sambhar Salt Lake Viral Video : राजस्थान हे विविध कला संस्कृतींनी नटलेले राज्य आहे. याच राज्यातील जयपूर जिल्ह्यात भारतातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे; जे सांभर सरोवर या नावाने प्रसिद्ध आहे. दरम्यान, हजारो वर्षांपासून हे सरोवर मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने या सरोवराला सांभर (अर्थ खाऱ्या जमिनीपासून काढलेले मीठ), असे नाव पडले असावे, असे सांगितले जाते. याच सरोवराजवळून भारतीय रेल्वे धावताना दिसते. दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांभर सरोवराजवळून धावणाऱ्या रेल्वेचा एक सुंदर, जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये निसर्गाच्या सुंदर, अनोख्या छटा पाहायला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहो, जो ट्रॅव्हल फोटोग्राफर राज मोहनने शूट केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले की, भारतातील सर्वांत मोठ्या अंतर्देशीय मिठागरावरील एक सुंदर रेल्वे प्रवास!

बँकेतील थरारक घटना! सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे लाखोंची रक्कम लुटणारे दरोडेखोर जेरबंद; पाहा VIDEO

ल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण- व्हिडीओतील सांभर सरोवराचे हे दृश्य अनेकांसाठी फारच नवीन होते. एका युजरने लिहिले, “सुंदर! पूर्वी आम्ही असे दृश्य आणि व्हिडीओ फक्त युरोपमध्ये पाहायचो! आता आमच्या देशात असल्याचा अभिमान आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “नयनरम्य आणि शांत!” तिसऱ्या युजरने लिहिले, “प्रवास करण्यासाठी सुंदर जागा.”

दरम्यान, सांभर सॉल्ट लेक हे भारतातील सर्वांत मोठे मिठाचे सरोवर आहे; जे पूर्व-मध्य राजस्थानमध्ये आहे. निसर्गप्रेमींसाठी ही एक सुंदर जागा आहे. दुरून बर्फासारखी दिसणारी ही उंच मिठागरे सरोवराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. सहसा उन्हाळ्यात येथील वातावरण कोरडे असते.

ब्रिटानिकाच्या मते, हे तलाव पारंपरिकपणे सहाव्या शतकात देवी शाकंबरीने तयार केले, असे म्हटले जाते; जी शिवाची पत्नी होती. सरोवराचे मीठ मुघल राजघराण्यानेदेखील पुरवले होते आणि नंतर ते जयपूर व जोधपूर या संस्थानांच्या संयुक्त मालकीचे होते.

दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अनेकदा असे मनोरंजक व्हिडीओ आणि फोटो शेअर करीत असतात. यापूर्वी त्यांनी बर्फाच्छादित आणि नयनरम्य स्थानकांचे अनेक फोटो शेअर केले होते; ज्यावर एक्स युजर्सना त्यांनी स्थानकांची नावे सांगण्यास सांगितले होते.