Viral video: आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरोसा नाही. आयुष्यात सुख-दुखाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येकवेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्देव ! अशा घटना या अनेकदा बघायला मिळतात. पोहणे हा सर्वांच्याच आवडीचा छंद आहे. पाणी दिसलं की पोहण्याची इच्छा होणार नाही अशा व्यक्ती विरळाच. त्यातून स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद वेगळाच. मात्र काही जण तिथेही प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असतात. अनेक लोक जीव धोक्यात घालून धोकादायक स्टंट करतात. असे स्टंट करताना अनेकांचे स्टंट फसतात आणि त्यांची छोटीशी चूक त्यांना महागात पडते. नुकत्याच समोर आलेल्या घटनेतही असंच काहीसं घडलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा स्विमिंग पूलच्या काठावर उभं राहून स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याचा तोल गेल्याने तो वाईटरित्या पडला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा मुलगा काठावर उभा राहून उलटी उडी मारून पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. हा तरुण स्विमिंग पुलचा काठ आणि जमीनीतील अंताराच्यामध्ये असणाऱ्या फटीत हा तरुण उलटा पडतो आणि अडकतो. त्याचा चेहरा त्या फटीत अडकतो तर पाय वर राहतात. यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली असेल. यामध्ये दिसत आहे की त्याच्या मानेला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे पाण्यातील मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेली ही ठिकाणे जसे स्विमिंग पूल, वॉटर पार्क हे तुम्ही समजता तितके सुरक्षित नसते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> घरात मुलगी असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून डोळ्यांत येईल पाणी

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर Americasgotnotalent नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले आहे, असा स्टंट करण्यापूर्वी तुम्हाला सरावाची गरज आहे, तर दुसऱ्याने लिहिले आहे,पुढच्या वेळी तो हा स्टंट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल. तर अनेकांनी मुलाबद्दल चिंता व्यक्त केलीय.