रात्री कर्फ्यूच्या काळात खलनायकाच्या स्टाईलमध्ये दुचाकीवर स्टंट करणाऱ्या दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता हाच व्हिडीओ त्या दोघांना चांगलाच महागात पाडला आहे. हा व्हायरल व्हिडीओ गृह राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी धाव घेतली आणि दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

व्हिडीओमध्ये दोन तरुण मोटरसायकलवर स्टंट करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये एक तरुण मोटरसायकल चालवताना दिसत आहे. तर दुसरा चालकाच्या खांद्यावर बसून सिगारेट ओढताना दिसत आहे. त्याच्या हातात पिस्तूलही दिसत आहे. व्हिडीओच्या पार्श्वभूमीत खलनायक हूं मैं हे गाण वाजत आहे.

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

सुरतचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या गावी रात्रीच्या कर्फ्यूच्या उल्लंघनाबाबतही पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. व्हायरल व्हिडीओची बाब संघवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. हा व्हिडीओ अमरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

(हे ही वाचा: बँक लॉकरमध्ये सापडलं ५०० कोटी किमतीचे पन्ना शिवलिंग, आहे १००० वर्षे जुनं)

(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)

तरुणांनी मागितली माफी

अमरोली पोलिसांनी तत्काळ दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले, निक उर्फ ​​नागाजन ओडेदरा (२६, रा. छपरभाथा हरिद्वार अपार्टमेंट) आणि भरत गढवी (२१, रा. छपरभाथा अंबिकानगर).

(हे ही वाचा: बिबट्याने हल्ला करताच कुत्र्याने त्याचाच पकडला जबडा; थरारक Video Viral)

पोलिस ठाण्यात दोघांनाही पोलिसांनी असा धडा शिकवला की दोघेही हात जोडून आपल्या कृत्याची माफी मागताना दिसले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stunt on a bullet with a pistol on the song i am a villain police caught the video going viral ttg