Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चालत्या बाईकवर चक्क पुशअप्स करीत आहे. रील बनविण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला त्याचा व्हिडीओ पाहून तुमचाही श्वास थांबेल.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा ते प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीही येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी त्यांना अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत.

हा व्हिडीओ बिहारमधला असून, हा तरुण धावत्या बाईकवर चक्क पुशअप्स मारून दाखवतोय. यावेळी बाईकचा जरा जरी तोल गेला तरी मोठा अपघात होऊ शकतो. त्यानं बाईक चालविताना दोन्ही हातांनी हॅण्डल्स पकडलेले नाहीत; तर हात फक्त समोरच्या टाकीवर ठेवले आहेत. तो बाईकवर पूर्णपणे झोपून पुशअप्स मारत आहे, यावेळी बाईकचा वेगही जास्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे थोडीशी चूकही जीवावर बेतू शकते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जेव्हा नवरदेवाला मनासारखी बायको भेटते..” पुण्यात तरुण नाचता नाचता कुठे पोहचला पाहा; VIDEO होतोय व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ niraj_yadav_2512 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा त्याचा पहिलाच स्टंट नाही,तर या इन्स्टाग्राम पेजवर तुम्ही या मुलाचे असंख्य व्हिडीओ पाहू शकता. त्यामध्ये तो विविध प्रकारचे स्टंट करून दाखवीत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले असून, व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “आयुष्य एवढं सहज मिळतं का? हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा लोक जगण्यासाठी रोज संघर्ष करीत आहेत?” तर आणखी एकानं म्हटलंय, “याला कठोर शिक्षा व्हायला हवी.”