Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चालत्या बाईकच्या सीटवर उभा आहे. रील बनवण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरु आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुमचाही श्वास थांबेल.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत.

Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Girl dance on Hi Poli Saajuk Tupatali marathi song video viral on social media trending news
“ही पोळी साजुक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद” तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

चालत्या बाईकवर उभा असलेला माणूस

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण वेगात बाईक चालवत आहे, यानंतर तोच तरुण चालत्या बाईकवर आपले दोन्ही हात सोडून उभा राहतो आणि बाईक वेगाने पुढे जाऊ लागते. आश्चर्यकारक बाब म्हणजे हायस्पीड बाईकवर उभी असलेली ही व्यक्ती हात सोडून समोरून धावणाऱ्या बसला ओव्हरटेक करते. मागून दुसऱ्या वाहनात बसलेल्या व्यक्तीच्या साथीदाराने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, वापरकर्त्यांनी बिहार पोलिसांना टॅग केले आणि त्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “…तर वंशाचे दिवे हवेतच कशाला” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया

@ChapraZila नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ८४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका युजरने लिहिले, “अशा लोकांना फक्त पोलीस लाठीमारच सुधारू शकतात.” यावर समस्तीपूर पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की…”यमराज झोपला असेल, पण समस्तीपूर पोलीस २४ तास जागे असतात.”

Story img Loader