Stylish Women Polling Officer Isha Arora : उत्तर प्रदेशातील सहारनपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आठ लोकसभा जागांवर मतदान होत आहे. पण मतदान राहिले बाजूला, इथे एका महिला पोलिंग ऑफिसरचीच जास्त चर्चा रंगतेय. आपल्या ग्लॅमरस लूकमुळे ही ऑफिसर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ईशा अरोरा असे या पोलिंग ऑफिसरचे नाव आहे. तिचे सौंदर्य एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

आपल्या ग्लॅमरस लूकसाठी व्हायरल होऊ लागलेल्या ईशाने तिच्या लूक आणि सौंदर्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलेली ईशा गंगोह विधानसभेच्या महगी गावात ड्युटीवर आहे. पण, यावेळी मतदानाशिवाय लोक तिच्या लूकबद्दल चर्चा करत आहेत.

आपल्या कामाबाबत ईशा म्हणाल्या की, ‘आपल्याला कोणतेही काम मिळाले तरी ते हलक्यात घेऊ नका, कामं वेळेवर झाली पाहिजेत. कार्यालयात जाणे असो किंवा मतदान केंद्रावर येणे असो. प्रत्येकाने वेळेची काळजी घ्यावी आणि नियमित काम करण्याचा प्रयत्न करावा. तसे नसेल तर एवढी मोठी निवडणूक घेणे शक्य होणार नाही. आपण आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ आणि त्यावरील कमेंट्सबाबत ईशा म्हणाली की, मला अजिबात वेळ मिळाला नाही. सतत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने मोबाइलकडे बघायलाही वेळ मिळत नाही.

व्हायरल आणि फेमस होण्याबाबत ईशा म्हणाली की, हो… छान वाटत आहे. यात सौंदर्याबद्दल काहीही नाही, तर वक्तशीरपणाबद्दल, मी वेळेवर ड्युटीवर पोहोचली, याला तुम्ही कामाची बांधिलकी असेही म्हणू शकता.

सहारनपूरची पोलिंग ऑफिसर ईशा तिच्या स्टायलिश लूकमुळे प्रसिद्धीझोतात आली होती, तिचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल होऊ लागला होता. लोक ईशा अरोराबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसू लागले. मतदान साहित्य घेण्यासाठी ती पोहोचली तेव्हा इतर मतदान अधिकारीही तिच्याबरोबर फोटो काढताना दिसले. पण, ईशाच्या ग्लॅमरस स्टाईलने सगळेच प्रभावित झाले.

कोण आहे ही ईशा अरोरा?

ईशा सर्व मतदारांना लोकशाहीच्या महान उत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करताना दिसली. ईशा अरोरा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहे. ती सहारनपूरची रहिवासी आहे. सध्या ती निवडणूक ड्युटीवर आहे. निवडणुकीची कामे चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करताना ती दिसतेय.

Story img Loader