भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी हे गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे त्यांना अनेकांकडून ट्रोल केले जात असताना आज पुन्हा त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला. स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या समर्थकांवर टीका करत ”मोदीभक्त माझ्या ‘पीएचडी’शी तुलना करू शकत नाहीत”, असे ट्वीट केले होते. त्यावरून अनेकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.

स्वामींनी काय केले होते ट्वीट

माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांच्या समर्थकांवर टीका केली होती. “ट्विटरवर मोदी भक्तांची समस्या ही आहे की ते अर्धशिक्षित आहेत. ते माझ्या पीएचडी आणि ज्ञानावर आधारित ट्विटशी स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे ते गैरवर्तन करतात आणि ब्लॉक होतात”, असे ट्वीट स्वामी यांनी केले होते.

तसेच त्यांनी “माझे १० दशलक्षाहून अधिक खरे फॉलोअर्स आहेत, तर मला ट्रोल करणाऱ्यांचे फक्त 10 ते 20 फॉलोअर्स आहेत. त्यासाठी त्यांना ट्विटरवर पैसे मिळतात”, असेही एक ट्वीट केले होते.

हेही वाचा – …अन् देवेंद्र फडणवीस हसून म्हणाले, “…म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही”; सभागृहात पिकला एकच हशा

पंतप्रधानांच्या समर्थकांकडून ट्रोलिंग

स्वामींनी केलेल्या या दोन्ही ट्वीटवरून पंतप्रधान मोदी यांच्या समर्थकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. एकाने ट्वीट म्हटले, ”कृपया तुमच्या पीएचडीचा फारसा अभिमान बाळगू नका. तुमच्या ज्ञानाचे आणि क्षमतेचे देशासाठी योगदान हाताच्या बोटावर मोजता येईल. जे लोक देशासाठी काहीतरी यश न मिळू देण्यासाठी प्रयत्न करतात. भारताने पहिली ६५ वर्षे मौल्यवान गमावली”

तर दुसऱ्या एका युजर्सने स्वामी यांनी दुसऱ्यांचेही ऐकूण घ्यावे, असा सल्ला दिला. त्याने ट्वीट करत म्हटले.

”स्वामी यांनी आपल्या ५० वर्ष जुन्या पीएचडीवर गर्व करू नये. येथे सर्वच शिक्षित आणि समजदार भारतीय आहेत. कधी कधी दुसऱ्यांना ऐकण्याचीही तयारी ठेवावी”

Story img Loader