सँडविच हा जगभरात सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे. सकाळचा नाश्ता असो वा दुपारचं जेवण असो आपण सँडविच कधीही खाऊ शकतो. बरं, प्रवास करताना किंवा पार्टी सेलिब्रेशनमध्ये देखील सँडविच खाता येतं. सँडविच इतकं लोकप्रिय झालंय कारण ते खाऊन चांगलं पोट भरतं. ज्यांना सँडविच खाण्याची आवड आहे त्यांनी एकदा तरी आयुष्यभर फ्री सँडविच मिळावं अशी इच्छा व्यक्त केली असेल. रेस्टॉरंट किंवा फूड ब्रँड फुकटात काहीतरी खायला देतील असं अशक्यच पण फास्ट फूड रेस्टॉरंट सबवे फ्रँचायझीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही आयुष्यभर फ्री सँडविच आणि कोल्ड ड्रिंक पिऊ शकणार आहात. काय आहे ही नेमकी ऑफर चला जाणून घेऊया.

आयुष्यभर फ्री सँडविच आणि कोल्ड ड्रिंकसाठी मात्र सबवेने एक अट ठेवली आहे, जर तुम्ही ती पूर्ण केली तर तुम्हाला आयुष्यभर मोफत सँडविच आणि कोल्ड ड्रिंक दिले जाईल.

vivian dsena in Bigg Boss 18
८ वर्षांत मोडला प्रेमविवाह, दुसऱ्या लग्नाआधी स्वीकारला इस्लाम धर्म; Bigg Boss 18 मध्ये दिसणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Woman Barking video viral
बाई sss हा काय प्रकार! बसमध्ये मोठ्याने गाणी ऐकणाऱ्या तरुणावर भुंकू लागली तरुणी; video पाहून युजर्स म्हणाले…
daljeet kaur
पहिल्या लग्नापासून मुलगा, अवघ्या ८ महिन्यात मोडलं दुसरं लग्न; अभिनेत्रीला विकावं लागलं राहतं घर, म्हणाली…
arbaz patel post after nikki tamboli safe bigg boss marathi 5
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…
Unbreakable love of old brother and sister
“कोण म्हणतं बहीण-भावाचं नातं आयुष्यभर टिकत नाही…” वृद्ध बहीण-भावाचं अतूट प्रेम दाखवणारा भावनिक VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Drunk Man Pets Cobra Leaves Internet Stunned Viral
“बाईsss….हा काय प्रकार?” दारुच्या नशेत व्यक्तीने थेट सापाबरोबर घेतला पंगा, पुढे काय घडले ते Viral Videoमध्ये पाहा
Grandson reunites ill grandmother with childhood friends after 50 years
“मैत्री इथपर्यंत पाहिजे!” ५० वर्षानंतर काठी टेकवत पोहचली मैत्रिणीच्या घरी; VIDEO तून पाहा रियुनियन अन् गप्पांची मैफिल

काय आहे अट?

ही अट अशी आहे की, तुम्हाला तुमचं नाव यामध्ये बदलावं लागणार आहे, तुमचं पहिलं नाव बदलून तुम्हाला “सबवे” असं नवं नाव करावं लागणार आहे. जो कोणी स्वतःचं नाव बदलून ‘सबवे’ ठेवेल त्याला कंपनी ही ऑफर देणार आहे. ही अट ज्यांना मान्य असेल त्यांनी SubwayNameChange.com वर १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ४ ऑगस्ट रोजी रात्री ११:५९ दरम्यान अर्ज करायचे आहेत. तसेच अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

नाव बदलून सबवे ठेवावं लागणार

विशेष म्हणजे, नाव बदलण्यासाठी कंपनी विजेत्याला $750 कायदेशीर शुल्क देईल. विजेत्याला $50,000 (रु. ४१ लाख) किमतीची सबवे गिफ्ट कार्ड मिळतील ज्याचा वापर आयुष्यभरासाठी सबवे वरून बर्गर आणि कोल्ड्रिंक्स खरेदी करण्यासाठी तुम्ही करु शकता. मात्र, ही स्पर्धा केवळ यूएसमधील कायदेशीर रहिवाशांसाठीच आहे.

हेही वाचा – उंचावर जाताच पाळणा अचानक तुटला; ४० मिनिटं लोक हवेतच, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

चार महिन्यांत द्यावे लागतील पुरावे

कोणीही स्वत:चे नाव ‘सबवे’ असे बदलल्यास नाव बदलाचा पुरावा दाखवण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली जाईल. अर्जदारांनी अधिकृत एंट्री फॉर्ममध्ये पूर्ण नाव, ईमेल पत्ता आणि जन्मतारीख भरणे आवश्यक आहे. वेबसाइटवर पोस्ट केलेल्या नियमांनुसार सर्व पात्र अर्जांमधून ७ ऑगस्ट २०२३ रोजी केवळ एकच विजेत्याची निवड केली जाईल.