हल्ली मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग बेरोजागारीच्या समस्येने चिंतेत आहे, शिक्षण आहे पण प्रचंड स्पर्धेमुळे नोकऱ्यांच्या जागा कमी आहेत. अशातच तरुण वर्गाला नोकरीपेक्षा व्यावसायकडे वळा असा सल्ला दिला जातो. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय करावा. जेणेकरून आपल्यासोबत आणखी तीन ते चार कुटुंबांना रोजगाराबरोबरच उदरनिर्वाहाचे साधन मिळू शकतो. नोकरी करणारा आज एखाद्या डॉक्टर, इंजिनिअरपेक्षाही जास्त कमावतोय. व्यवसाय हा प्रत्येकवेळी मोठाच असावा, मोठ्याच जागेत असावा हे गरजेचं नसतं. एका गोठ्यातही लाखोंचा व्यावसाय तुम्ही उभा करु शकता, अशाच एका दुध व्यावसायीकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नोकरी सोडून दुग्ध व्यवसाय

व्यवसाय सुरू करायचा म्हणजे भांडवल हवं. भांडवलाची गुंतवणूक केल्याशिवाय चांगला फायदा देणारे व्यवसाय करता येत नाहीत, असा एक समज आहे. मात्र, सध्याचा काळ बदलतो आहे. सध्या कमी भांडवलातही व्यवसाय सुरू करून त्यात जम बसवता येऊ शकतो, आणि त्यातून लाखोंची कमाई करु शकता. शेती या मुख्य व्यवसायाला जोडव्यवसाय म्हणून दूध व्यवसायाची ओळख आहे. मात्र, याच जोडव्यवसयात सातत्य आणि नाविण्यपूर्ण उपक्रम राबवल्यास काय होते हे या शेतकऱ्यानं दाखवून दिलेले आहे. दूध विकून वर्षाकाठी कोट्यावधी रुपये कमावल्याचे ते सांगतात.

महिन्याला लाखोंची कमाई

एकदाच जर यामध्ये गुंतवणूक केली तर पुढची अनेक वर्ष चिंता नसल्याचही ते सांगतात. तसेच सध्या दहा दिवसाला ७० ते ८० हजार रुपये दुध व्यवसायात कमावत असल्याचं ते सांगतात. वाढत्या दुग्ध व्यवसायमूळ किमान ७ ते ८ जणांना स्थानिक रोजगार उपलब्ध झालाय. डेअरीतील कामे व दूध पोहोचवणे या कामांसाठी लोक कार्यरत असल्याचंही ते सांगतात. शेवटी नोकरीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:चा व्यावसाय करण्याचा सल्ला हे शेतकऱ्यांना आणि तरुणांना देतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कोल्ड ड्रिंक घेण्यासाठी तो प्लॅटफॉर्मवर आला; मात्र ट्रेनमध्ये चढताना रुळावर पडला, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @r.n_agrow_feeds या इन्स्टाग्राम अकाऊंटरुन शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत लाखोमध्ये व्ह्युज मिळाले आहेत. तसेच नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.