Viral video: भावी प्रशासक घडविणाऱ्या स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं तरुणांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. प्रशासकीय अधिकारीपद आणि त्यातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणारी मुलं या क्षेत्राकडे वळत आहेत. मात्र या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बहुसंख्येने ग्रामीण क्षेत्रातून शहरात येणाऱ्या मुलांना नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं? स्वत:ला या कठीण अभ्यासासाठी तयार करत, उत्तीर्ण होणं या सगळय़ामुळे अनेकदा या मुलांवर ताण येत राहतो.
मात्र यातूनही कितीतरी वेळा अपयश पचवून काहीजण यश खेचून आणतात. असं असलं तरी संघर्षाच्या काळात मित्रांची नातेवाईकांची साथ महत्त्वाची भूमीका बजावते. अशातच सोशल मीडियावर काही तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वैभव पडवळ यांची नुकतीच DYSP पदी निवड झाली आहे. यावेळी आपला मित्र DYSP झाला हे कळताच तरुणांनी अक्षरश: त्याला डोक्यावर घेतलं. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. हेच मित्र आयुष्यात फार महत्त्वाची भूमीका बजावत असतात. अशाच मित्रांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सगळे मित्र उभे आहेत आणि काही वेळातच तरुणाचा रिझल्ट लागणार आहे. यावेळी तरुण मोबाईलवर रिझल्ट तपासत असतो आणि त्याला आनंदाची बातमी मिळते. तो परिक्षेत पास झाला असून तो आता DYSP झालेला आहे. हे कळल्यावर तो अक्षरश: नाचू लागतो. तर आपला मित्र अधिकारी झाल्याचं कळताच इतरंही सगळे जल्लोष करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ @policebharti_mpsc या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> दीड फुटाचा डेस्क, त्यावर गाळलेला घाम अन् नाहीसं झालेलं कित्येक पिढ्यांचं दुःख! पोलिस उपनिरीक्षकाची पोस्ट व्हायरल
स्पर्धा परिक्षा म्हणजे खरोखरंच विद्यार्थ्यांसाठी एक मोठं लक्ष्य असतं. मात्र यावेळी विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही धीर धरला पाहिजे. झटपट यश मिळत नाही. भावनेवर पदे मिळत नाहीत. त्यासाठी अभ्यास आणि अभ्यासच लागतो.
स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होणे, पोलिसी गोल टोपी मिरवणे किंवा रुबाबात गाडीत फिरण्याचे स्वप्न ठेवणे काही चूक नाही. मात्र, अनेकदा असे होते की, आपण आपली क्षमता आणि गुणवत्ता याचा ताळमेळ न बसवता या फंदात पडून आपले आयुष्य वाया घालवतो. काहींना यश मिळते. मात्र, ते खूप मोजके असतात. तर, अनेक गुणवत्तापूर्ण मंडळी आपला महत्वाचा वेळ या चक्रव्यूहात खर्ची घालतात. माध्यमांच्या बातम्या आणि सामाजिक स्टेट्स यामुळे हे चक्रव्यूह आणखी घट्ट होत आहे. आपण स्वतः निर्णय घेतला असेल व मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल. संयम खुप लागतो. कारण शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे जो टिकेल तोच जिंकेल.