भावी प्रशासक घडविणाऱ्या स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचं तरुणांचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. प्रशासकीय अधिकारीपद आणि त्यातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणारी मुलं या क्षेत्राकडे वळत आहेत. मात्र या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बहुसंख्येने ग्रामीण क्षेत्रातून शहरात येणाऱ्या मुलांना नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं? स्वत:ला या कठीण अभ्यासासाठी तयार करत, उत्तीर्ण होणं या सगळय़ामुळे अनेकदा या मुलांवर ताण येत राहतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र यातूनही कितीतरी वेळा अपयश पचवून काहीजण यश खेचून आणतात. दरम्यान असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी रिझल्ट लागल्यानंतर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन अंदाज येतो की, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारी मुलं किती झोकून देऊन अभ्यास करतात. एवढचं नाहीतर ज्या ठिकाणाहून आपण वर आलोय त्याला कधी विसरायचं नसतं हेच शंकर पाटील यांनी यातून दाखवलं आहे. शंकर पाटील हे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना, एका लायब्ररीत दीड फुटाच्या डेस्कवर बसायचे. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा या डेस्कचे आभार मानन्यासाठी पळत याठिकाणी आले. तेव्हाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून शंकर पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एक फोटो शेअर करत त्यांनी जे कॅप्शन लिहलं आहे, ते वाचून प्रत्येक जण भारावून गेला आहे. ते कॅप्शनमध्ये लिहतात,

दीड फुटाचा डेस्क
त्यावर गाळलेला घाम
आणि त्यातून नाहीसं झालेलं
कित्येक पिढ्यांचं दुःख

याने घट्ट पकडून ठेवलं म्हणून तर हे सगळं शक्य झालं…

गुलाल अंगावर झेलताना तो आठवला आणि पळत पळत इथवर आलोय
त्याला एकदा डोळ्यात साठवलं की पुढचा प्रवास करताना त्याचं नैतिक दडपण वाट चुकू देणार नाही ….

आभार तुझे रे …

पाहा पोस्ट

हेही वाचा – स्वप्नपूर्ती! वडील पोलीस अन् लेक झाली ‘पोलीस उपनिरीक्षक’; रस्त्यावर झळकलेले बॅनर पाहून आईला अश्रू अनावर

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होणे, पोलिसी गोल टोपी मिरवणे किंवा रुबाबात गाडीत फिरण्याचे स्वप्न ठेवणे काही चूक नाही. मात्र, अनेकदा असे होते की, आपण आपली क्षमता आणि गुणवत्ता याचा ताळमेळ न बसवता या फंदात पडून आपले आयुष्य वाया घालवतो. काहींना यश मिळते. मात्र, ते खूप मोजके असतात. तर, अनेक गुणवत्तापूर्ण मंडळी आपला महत्वाचा वेळ या चक्रव्यूहात खर्ची घालतात. माध्यमांच्या बातम्या आणि सामाजिक स्टेट्स यामुळे हे चक्रव्यूह आणखी घट्ट होत आहे. आपण स्वतः निर्णय घेतला असेल व मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल. संयम खुप लागतो. कारण शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे जो टिकेल तोच जिंकेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story police officer competitive examination education government service mpsc upsc marathi shankar patil become sub inspector srk