वडील आणि मुलगी हे एक असं नातं आहे, ज्या नात्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे. ज्या वडिलांना पाहून घरातल्यांचा थरकाप उडतो, ज्यांचा घरातच नव्हे तर बाहेरही चांगलाच दरारा असतो अशा बाबांशी मुलींचं नातं म्हणजे एखाद्या मित्राप्रमाणे असतं. आहे की नाही ही गंमत. असंच एक नातं सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. मुख्य म्हणजे वडील- मुलीच्या या नात्याची सोशल मीडियावरही बऱ्यापैकी चर्चा सुरु आहे. लेक पीएसआय झाल्यानंतर तिचा बॅनर पाहून आईला अश्रू अनावर झाले आहेत. हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वडिलांपाठोपाठ लेकही पोलीस दलात
वडीलांपाठोपाठ मुलगी सुद्धा पोलिस दलात दाखल झाली. मुलं आपल्या आई-वडिलांचं सर्वात जास्त अनुकरण करतात, मात्र वडिल म्हंटलं की जरा अंतर आलंच. मात्र त्यांच्या शिस्तीनेच मुलं यशाचं शिखर गाठतात. आज प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम केलं पाहिजे, यासाठी अनेक जणी प्रयत्न करत असतात. असचं स्वप्न पीएसआय स्नेहल जगदीश पाटीलनं पाहिलं आणि मेहनतीच्या जोरावर आज ते स्वप्न सत्यात उतरवलं आहे. स्नेहलने वडिलांप्रमाणेच पोलीस खात्यात आपलं पहिल पाऊल ठेवलं आहे. यावेळी जागोजागी तिच्या अभिनंदनाचे पोस्टर लागलेले असताना, रस्त्यावरुन जाताना हे पोस्टर तिची आई पाहते आणि तिची पावलं तिथंच थांबतात.
स्वप्नपूर्ती!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, किती कुतूहलाने आई आपल्या मुलीचं यश पाहत आहे हे शब्दात सांगता येणारं नाही. आईच्या डोळ्यातलं पाणी आणि कौतुक पाहून तुम्हालाही स्नेहलचा अभिमान वाटेल. आपली मुलं आपली स्वप्न पूर्ण करताना पाहून प्रत्येक आई-वडिलांना असाच आनंद होतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ‘म्हारी छोरी छोरों से कम है के!’ फेमस होण्यासाठी तिनं हद्दच पार केली, VIDEO पाहून संतापले नेटकरी
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला मोठी पसंती दिली आहे. तर स्नेहलच्या आईच्या यावेळी चेहऱ्यावर अभिमानाची भावना स्पष्टपणे झळकत होती.