Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात; तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहीत आहे की, आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच माय-लेकाचा एक भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक तरुण म्हणेल की, आईच्या चेहऱ्यावरील याच आनंदासाठी कष्ट करायचेत.
आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस झाल्याचं आईला सांगत आहे. हा भावनीक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
आपल्या मुलांची प्रगती पाहून आपल्यालाही प्रचंड आनंद होतो. त्यातून जर का आपल्या मुलानं किंवा मुलीनं आपल्याला सरप्राईज केले तर मात्र पालकांचा आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. खरंतर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जेवढी मेहनत मुलं घेतात तेवढीच मेहनत पालकही घेत असतात. परीक्षा जवळ आल्यावर जशी धाकधूक मुलांना असते तशीच पालकांनाही होते. पण जेव्हा मुलं ही परीक्षा चांगल्या मार्काने पास करतात तेव्हा मात्र आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मुलांना मिळालेल्या यशाचा जर सर्वात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो पालकांना होतो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये एका तरुणानं पोलिसात भरती झाल्यानंतर आपल्या आईला घरी येऊन थेट आनंदाची बातमी दिली. यावेळी आईला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. तसेच तरुणानं कित्येक पिढ्यांचं दुःख दूर केलेल्याचं समाधानही आईच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ mpsc_success_spot नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.