Success Story Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्या आजू बाजूला आपल्याला अनेक लोकांची परिस्थिती बिकट असल्याची पाहतो. आई वडील मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्व:ताच्या स्वप्नांचा त्याग करतात. आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा माय-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संगमनेरच्या केवल दारासिंग कतारी याची प्रेरणादायी कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा

आई वडिलांसोबत पोळपाट लाटणं विकलं, कॉलेज शिकता शिकता लग्न समारंभात वाडपी म्हणून काम केलं. घरची परिस्थिती तशी बेताची. पण त्याने हार मानली नाही. संघर्ष करत त्यानं शेवटी यशाला गवसणी घातलीच. संगमनेरचा केवल दारासिंग कतारी आता मुंबई पोलीस म्हणून रुजू होतोय. केवल हा संगमनगरच्या संजय गांधी झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोलपाट लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत किंवा आठवडे बाजारात माल विकण्यासाठी जातात. केवल देखील त्यांच्यासोबत माल विकण्यासाठी जात असे. मात्र अशा परिस्थितीला कारण न बनवता केवलनं प्रचंड मेहतीनं यश संपादन केलं.

पैशाअभावी लायब्ररीतूनही हकललं

२०१८ ला पहिली पोलीस भरतीची परीक्षा दिली. त्यावेळी १७६ चा कट ऑफ लागला पण त्याला १७० गुण होते. काही गुणांमुळे त्याला अपयश आलं मात्र २०१९ मध्ये पूर्ण तयारी केली पण तेव्हा लॉकडाऊन लागला.त्यानंतर त्याने अभ्सास बंद केला आणि बियर बारमध्ये वेटरचे काम केले. दरम्यान जानेवारी २०२२ पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. सप्टेंबरमध्ये पोलीस भरती निघाली. त्यावेळी फॉर्म भरला. नगरपालिकेच्या लायब्ररीत अभ्यास करण्याचा निर्णय त्याने घेतला. पण तेथे भरायला पैसे नव्हते म्हणून लायब्ररीतून बाहेर काढले. अशा परिस्थीतीही तो जिद्द हरला नाही त्यानं अभ्यास केला अन् आपलं ध्येय गाठलं.

माय-लेकाला अश्रू अनावर

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, केवलने चाळीत पाऊल ठेवताच काही मुलं नाचू लागतात. केवल खरंतर पोलीस खात्यात निवड झाल्याची बातमी घेऊन आला होता, मात्र घरी ही आनंदाची बातमी तो यायच्या आधीच पोहचली होती. हे पाहून केवलला अश्रू अनावर होतात. ज्या ठिकाणी अभ्यास केला त्या ठिकाणी उभं असताना त्याला संघर्षाच्या काळातील सगळे दिवस जणू आठवत होते. त्यानंतर तो त्याच्या घराच्या दिशेने जातो आणि आईला मिठी मारतो. यावेळी दोघे माय-लेक धाय मोकलून रडू लागतात. घरची हालाकीची परिस्थिती असताना लेकानं केलेले कष्ट आणि आता त्याचं यश हे सगळं पाहून आईलाही प्रचंड आनंद झाल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: गुजरातमध्ये राहून झाली महाराष्ट्राची फौजदार! PSI पूजा कदम सांगतेय स्पर्धा परिक्षेतील यशाचं रहस्य

हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. बापनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story sangamner keval katari become maharashtra police emotional video of mother and son goes viral on social media srk
Show comments