आजपर्यंत आपण सर्वांनी अनेक प्रकारचे पक्षी पंख पसरून आकाशात उडताना पाहिले आहेत. पण तुम्ही कधी निर्जीव वस्तू हवेत उडताना पाहिली आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अनोखी सायकल हवेत उडताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हवेत एक अनोख्या डिझाईनची सायकल उडताना दिसत आहे. हे पाहून सरूवातीला तुम्ही हैराण व्हाल. इतकी जड सायकल हवेत कशी काय तरंगू लागली, असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. पण हे खरंय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून पाहणारे केवळ पाहतच राहीले आहेत. एक माणूस ही सायकल चालवताना दिसून येत आहे. ही कोणती हवेत उडणारी सायकल तर नाही ना, असे सारेच जण विचारू लागले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पेट्रोल महागले, गर्लफ्रेंडला भेटता येत नाही म्हणून बॉयफ्रेंडची ही व्यथा एकदा ऐकाच

पण खरं ती कोणती सायकल नव्हे तर एक अनोख्या डिझाईनची पतंग आहे. सध्या या अनोख्या पतंगाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अशी पतंग तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल. जणू काही एक माणूसच हवेत सायकल चालवतोय, असाच भास ही पतंग पाहून वाटू लागतो. किती मेहनतीनंतर कलाकाराने हा पतंग बनवला असावा, असा विचार करायला तुम्हाला भाग पडेल. व्हिडीओ पाहून पतंग बनवणाऱ्या कलाकारावर तुमचा विश्वास बसेल.

आकाशात पेडल मारून एखादी व्यक्ती सायकल चालवत असल्याचा पतंग कलाकाराने साकारला आहे. एक बालक हा अनोखा पतंग हवेत उडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : ‘मैं झुकेगा नहीं साला’ नवरदेवाने मारली पुष्पा स्टाईल; लोक म्हणाले, “झुक जा नहीं तो…”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मगरीला स्वतःच्या हाताने खाऊ घालण्याची बरीच हौस; मग पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO

सगळ्यात आधी तो पतंग लहान मुलाने धरलेला दिसतो. यानंतर तो हवेत सोडतो. पतंग हवेच्या संपर्कात येताच तो वर येऊ लागतो. सध्या हा व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेले नाही, मात्र ही कला कोणी केली आहे. लोक त्याची जोरदार स्तुती करत आहेत. हा व्हिडीओ lofarmehkma नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Story img Loader