आज २०२४ या नवीन वर्षाचा पहिला दिवस. सगळ्यांनी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत अगदी थाटमाटात केलं. आज सोशल मीडियावर फोटो, रील किंवा काही खास मेसेज पाठवून प्रत्येक जण त्यांच्या पद्धतीत इतरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. प्रसिद्ध वाळू कलाकार यांनीसुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ट्विटरवरून एक खास गोष्ट शेअर करून, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी वाळूशिल्प रेखाटलं आहे. त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत खास फुलांच्या साह्यानं केलं आहे. हॅप्पी न्यू इयर (Happy New Year) एका छोट्या वर्तुळात; तर वेलकम २०२४ (Welcome 2024) हे भगव्या आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांनी सजवलं आहे. तसेच या शिल्पास चारही बाजूंनी रंगीबेरंगी फुलांनी आणि छोट्या रोपट्यांनी सजावट करून घेतली आहे.

हेही वाचा…Google Doodle: नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज! सरत्या वर्षाला निरोप देत गुगलने सादर केलं हटके डूडल…

पोस्ट नक्की बघा :

ओडिशा राज्यातील पुरी बीचवर सुदर्शन पटनायक यांनी हे खास शिल्प प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी सादर केलं आहे. तसेच “नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! या वर्षात प्रदूषणमुक्त पर्यावरणाची शपथ घेऊ या” अशी कॅप्शनसुद्धा पोस्टला दिली आहे. त्यांनी नवीन वर्षासाठी खास रेखाटलेल्या वाळूशिल्पाचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

सुदर्शन पटनायक हे प्रसिद्ध वाळू कलाकार आहेत. कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सुदर्शन पटनायक मूळचे ओडिशा राज्यातील आहेत. ते पुरी बीचवर वाळूपासून अनेक कलाकृती बनवीत अनेकांची मनं जिंकत असतात. आज त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास कला वाळूत सादर केली आणि पर्यावरणाचा संदेश दिला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @sudarsanpattanik या त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.