वनडे विश्वचषक २०२३ ही क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा विश्वचषकाचा अंतिम सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. तसेच हा सामना पाहण्यासाठी चाहते अगदीच उत्सुक आहेत. विविध माध्यमांतून या दिवसाला आणखी खास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर मीम्स, रील व्हिडीओ, खास पोस्ट शेअर केल्या जात आहेत. अशातच प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देत वाळूत खास कला सादर केली आहे.

प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनीही ट्विटरवरून एक खास गोष्ट शेअर केली आहे आणि भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. सुदर्शन पटनायक यांनी वाळूत वर्तुळाकार मैदान रेखाटले आहे. त्यात हिरवा रंग भरण्यात आला आहे. तसेच वर्तुळाला निळ्या-लाल रंगाची बॉर्डर दिली आहे. मधोमध वर्ल्ड कप ट्रॉफीचे चित्र काढले आहे आणि ‘गुड लक टीम इंडिया’ (Good Luck Team India), असे इंग्रजी अक्षरांत लिहिले आहे. सुदर्शन पटनायक यांनी टीम इंडियासाठी रेखाटलेले खास चित्र एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.

anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
Shubman Gill Overtakes Cheteshwar Pujara
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील
Rishabh Pant attained a stellar milestone and surpassed his idol, MS Dhoni
Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे
atharvaveda bhumi suktam
भूगोलाचा इतिहास: वसुंधरेच्या कायापालटाची कहाणी
IND vs PAK Hong Kong Super 6 Pakistan Beat India by 7 Wickets Robin Uthappa Manoj Tiwary
IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य
Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

हेही वाचा…VIDEO: शमी विकेट घेणार, कोहली शतक ठोकणार आणि आपण वर्ल्डकप जिंकणार; तरुणांचं वर्ल्डकप फायनलसाठी भन्नाट गाणं

पोस्ट नक्की बघा :

वाळूत रेखाटलेल्या चित्राला बाउल अन् चेंडूने सजवले :

सुदर्शन पटनायक पुरी बीचवर ५६ फूट लांब विश्वचषक ट्रॉफी वाळूत रेखाटून सुमारे ५०० स्टीलचे बाउल आणि ३०० क्रिकेट बॉल्स वापरून वर्ल्ड कप ट्रॉफीला सजवले आणि खास देखावा तयार केला. तसेच हे वाळूशिल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे सहा तास लागले आणि त्यांच्या सॅण्ड आर्ट इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी हे चित्र पूर्ण करण्यास त्यांना मदत केली. तसेच वाळूत ‘गुड लक टीम इंडिया’ या शब्दांतील शुभेच्छा इंग्रजी भाषेतील चेंडूंनी लिहिली आहे. विविध रंगांच्या सजावटीद्वारे ही खास कलाकृती सादर करण्यात आल्याचे तुम्हाला दिसून येईल.

सुदर्शन पटनायक हे प्रसिद्ध वाळू कलाकार आहेत. कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना २०१४ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सुदर्शन पटनायक मूळचे ओडिशा राज्यातील आहेत. ते वाळूपासून अनेक कलाकृती बनवीत अनेकांची मने जिंकत असतात. आज त्यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामान्यनिमित्त भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी ही खास कला वाळूत सादर केली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @sudarsansand या त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.