Viral video: मुलांना जन्म देणं सोप झालंय पण त्यांचं पालनपोषण आणि संगोपन ही आता महत्वाची गोष्ट झाली आहे. मुलांना कसे वाढवावे याच्या सूचना कायमच पालकांना मिळत असतात. पण मुलांना अगदी लहान वयापासूनच उत्तम व्यक्ती बनवणं हे गरजेचं आहे.
पालक आणि मुलं यांच्या कायमच एक चांगला बॉन्ड असणे गरजेचे आहे. पण असे असले तरीही ही दोन्ही वेगवेगळी व्यक्तीमत्व आहेत. सुधा मुर्तींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्यांनी पालकांन काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या मुलांना आदर्श व्यक्ती होण्यासाठी १०० टक्के मदत करतील.
आपल्या मुलांची इतरांशी तुलना केल्याने पालक आणि मुलांमधील नात्यांमध्ये गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात. मुलांची नेहमी तुलना केल्याने त्यांच्यांवर विनाकारण दबाव पडतो. जेव्हा आपल्या पाल्य आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्यावेळी आपले त्यांच्याप्रती व्यवहार बदलायला लागतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये भिती किंवा तणाव वाढतो. असे कधी गरजेचे नाहीये की, पालकांच्या इच्छा पूर्ण करण्यातच मुलांना आनंद मिळत असेल. असू शकतं की, मुलांचा आनंद कोणत्यातरी दुसऱ्या कामात असेल. प्रत्येक फूल वेगळं असतं त्याला त्याच्या कलाने फुलुदेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मुकेश अंबानी सोशल मीडियावर झाले ट्रोल! लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लावा, शिक्षण मग नोकरी, लग्न या साचात त्यांना न बसवता त्यांचं आयुष्य त्यांना हवं तसं जगुद्यात असाही सल्ला त्यांनी दिला. पालक झाल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या अनेक पट वाढतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करीत असाल. परंतु तुम्हाला असं वाटत राहतं की, आपल्या मुलाने त्याच्या वयाच्या हिशोबाने प्रत्येक गोष्टीत बेस्ट असायला हवे. तर अशा अपेक्षा करणं चुकीचं आहे.