बहुप्रतीक्षित श्री राम मंदिराचे उदघाट्न उद्या २२ जानेवारीला होणार आहे आणि देशात श्री राम मंदिराच्या उदघाट्नचा उत्साह दिसत आहेत. ठिकठिकाणी सजावट, तर अनेक रामभक्त श्री राम मंदिरासाठी खास रांगोळी, बिस्किटांपासून मंदिर, अगरबत्ती, मिठाई तर काही जण श्री राम मंदिरासाठी खास गाणं आणि डान्स सादर करताना सुद्धा दिसून आले आहेत. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात कारच्या मदतीने अद्भुत श्री राम मंदिर बनवलं आहे.
हैदराबादचे रहिवासी सुधाकर यादव हे भारतीय कार डिझायनर आहेत. यांनी सामान्य कारचे एका अनोख्या कलाकृतीमध्ये रूपांतर करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तर आता एक खास कार त्यांनी प्रेक्षकांनसमोर सादर केली आहे. सुधाकर यादव यांनी श्री राम मंदिरासारखी एक हुबेहूब कार बनवली आहे. २२ फूट लांबी आणि १६ फूट उंच असे हे सुंदर मंदिर त्यांनी साकारले आहे आणि भगवा झेंडा सुद्धा लावला आहे. एकदा बघाच गाडीच्या मदतीने बनवलेलं हे सुंदर श्री राम मंदिर.
हेही वाचा…अन्न, वस्त्र अन् निवारा! चिमुकल्याचा ‘तो’ VIDEO पाहून आनंद महिंद्रा म्हणाले; आधी फोन मग…
व्हिडीओ नक्की बघा :
पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, कारचा उपयोग अद्भुत कला दाखवण्यासाठी केला आहे. मंदिराचा सुद्धा बारकाईने अभ्यास करून, महत्वाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मंदिराची रचना केली आहे. खाली कारची चाकं आहेत आणि यावर हे सुंदर मंदीर अगदी हुबेहूब साकारलं आहे ; जे पाहून तुम्ही नक्कीच कौतुक कराल. १८ जानेवारी रोजी या कारची पहिली झलक दाखवण्यात आली आहे ;जी सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. पोस्टमधील व्हिडीओत तुम्हाला सुधाकर यादव यांची उत्तम कामगिरी आणि कारपासून साकारलेल्या या भव्य मंदिराची एक झलक पाहता येईल ; जे पाहून तुम्ही थक्क व्हाल.
सोशल मीडियावर ही पोस्ट सूर्या रेड्डी यांच्या एक्स (ट्विटर) @jsuryareddy अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. याआधी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सुधाकर यादव यांनी मेकअप कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक यांसारख्या वस्तूंसारखी कार सादर केली होती. तसेच सर्वात मोठी सायकल तयार करण्यासाठी त्यांना आधीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा मिळालं आहे.