Sugarcane Farming: पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पीक आहे. या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या पिकाचे उत्पादन वाढीसाठीही दिवसेंदिवस शेतकरी झटत आहेत. यामध्ये काही शेतकरी यशस्वीही होत आहेत.एकीकडे एकरी २० टन ऊस उत्पादन घेणारा शेतकरी, तर दुसरीकडे एकरी १२० टनांपेक्षा जास्त उत्पादन घेणारे प्रयोगशील शेतकरी असे वेगवेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळते. ‘उसाच्या विक्रमी उत्पादनासाठी जमिनीच्या पूर्वमशागतीपासून तोडणीपर्यंत नियोजन महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रतीच्या रोपांची निवड, लावण, खत व पाणी व्यवस्थापन योग्य पध्दतीने केल्यास अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य आहे. दरम्यान अशाच एका ऊस उत्पादक शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये या शेतकऱ्याचा ऊस ३७ कांड्यांवरती गेलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाहहह ऊस असावा तर असा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऊस उगवण, फुटवे, कांडी सुटणे, जोमदार वाढ या ऊस वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था आहेत.पाण्याचा अतिवापर, पूर्व मशागतीकडे दुर्लक्ष यामुळे जमिनीची सुपिकता घटते. कमी पाण्यात उसाचे चांगले उत्पादन शक्य आहे. उसाला पाणी व खते ठिबकद्वारे द्यावीत. पिकाच्या गरजेप्रमाणे अन्नद्रव्ये दिल्यास उसाची जोमाने वाढ होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अशाप्रकारे योग्य नियोजन केल्यास ऊसाचं पिक चांगलं येऊ शकतं.पाण्याचा अतिवापर, पूर्व मशागतीकडे दुर्लक्ष यामुळे जमिनीची सुपिकता घटते.खताशिवाय उत्पादन वाढीसाठी जमिनीचा पोत, हवामान, मशागत, जमिनीचा ईसी, पीएच, सेंद्रिय कर्ब व जमिनीत अगोदर शिल्लक असलेल्या खताकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे उत्पन्न कमी होतं. अशाच प्रकारे माती परीक्षणाविना शेतकरी खतेदेत राहिला तर जमिनीतील शिल्लक खतांचा व वरून देत असलेल्या खतांचा मेळ न जमल्यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत जाणार आहे. आणि मग रासायनिक खतांमुळे जमिनी खराब होत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा शेतकरी आपल्या शेतातून एक मोठी ऊसाचा कांडी घेऊन येतो आणि त्याच्या कांड्या मोजतो. तर चक्क ३७ कांड्याएवढा हा ऊस उंच वाढलेला तुम्ही पाहू शकता. यावेळी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही सांगून जात आहे. दरम्यान यामागे या शेतकऱ्याची प्रचंड मेहनत, नियोजन आहे हे विसरून चालणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली चिरडलेलं निरागस बालपण; स्वत:च्या परिस्थितीवर नाराज असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, शेती मशागतीचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी, पाणीपट्टी आदींमुळे उसाचा एकरी खर्च एक लाखाच्या घरात पोहोचला आहे. त्यातच सततच्या अवकाळी पावसामुळे एकरी उत्पादन घटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane farming information happy farmer video viral on social media srk