Viral video: रणरणत्या उन्हात तुम्ही एखाद्या रस्त्यावरुन चालले असाल. घसा कोरडा पडला असेल तर, तुम्हाला कसली आठवण येते? घशाला कोरड पडल्यावर उन्हाळ्यात पाणी प्यावसं वाटतंच. पण, त्याबरोबर थंडगार सरबत किंवा मग ऊसाचा रस प्यावा असं वाटतंच. ऊसाचा रस पिण्याचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. रस्त्यावरुन जाताना रसवंती गृहातल्या घुगरांचा आवाज आला की आपसूक आपली पावलं त्याकडे वळतात. उन्हाळ्यात रसवंती गृहातच नाही तर, रस्त्यावर लाकडी गुऱ्हाळावरही रस पिण्यासाठी सगळेजण गर्दी करतात. कोल्ड्रींक पेक्षा ऊसाच्या रसाची किंमत कमीच असते. त्यामुळे जाहिरातीची गरज पडत नाही. मात्र आता कॉम्पिटीशन वाढलं आहे. त्यामुळे अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बरेचजण नवीन नवीन आयडीया शोधत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक व्यावसायिक छोट्यातली छोटी वस्तूदेखील अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी अनेक आयडिया वापरल्या जातात. अशाचप्रकारे एका व्यावसायिकाने ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी एक भन्नाट आयडिया वापरली आहे. दुकानदाराने आपला रस जास्त प्रमाणात विकावा म्हणजेच आपल्या दुकानात जास्त ग्राहक यावेत यासाठी भन्नाट जुगाड केले आहे. आणि या जुगाडाचा फायदा देखील त्या दुकानदाराला नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळाले आहे. दुकानदाराने चक्क उसाच्या रसात बर्फ न टाकता चक्क बर्फ फ्रिजरमध्ये गार होण्यासाठी ठेवला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्याने ऊस गार करण्यासाठी नवीन मोठे फ्रिज विकत घेतले आहे. आणि तो त्या फ्रीजमध्ये ऊस दोन अडीच तास गार होण्यासाठी ठेवत आहे. आणि त्यानंतर ग्राहकांना त्या उसाद्वारे काढलेला रस पिण्यासाठी देत आहे. यामुळे ग्राहकांना ऊस गार लागत आहे आणि ऊस एकदम घट्ट देखील राहत आहे. यामुळे त्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक एक ग्लास रस पिण्याऐवजी दोन ग्लास रस पिल्याशिवाय उठत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जॅग्वार कार उलट्या बाजूनं चालवत पोलिसांवरच आरेरावी; शिवीगाळ करुन…संतापजनक VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @chai.yogi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्यक्तीची बिझनस आयडीया सगळ्यांनाच आकर्षित करत आहे तर नेटकरीही भरभरुन कौतुक करत आहेत.