देशातील अनेक राज्ये उष्णतेच्या तडाख्याचा सामना करत आहेत. काही ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. हवामान खात्याने संपूर्ण भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. ओडिशातही उष्णतेची लाट पसरली आहे आणि त्यामुळेच गॅसशिवाय अन्न शिजवता येत आहे. बरोबर वाचलं तुम्ही, लोक गॅसशिवाय अन्न शिजवत आहेत.
कार बोनेटवर चपाती
हे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ओडिशातील सोनपूर येथील आहे. जिथे एक महिला गाडीच्या बोनेटवर उन्हात चपाती बनवताना दिसते. हा व्हिडीओ नीलमाधब पांडा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझे शहर सोनपूरचे दृश्य. इथे इतके गरम तापमान आहे की गाडीच्या बोनेटवर चपाती नवता येते.’
(हे ही वाचा: मॅक्सवेलच्या लग्नाच्या पार्टीत विराट कोहलीने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
(हे ही वाचा: सासूने ओवाळून नववधूच्या डोक्यातच घातला नारळ; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
२ मे पर्यंत कॉलेज बंद
ओडिशातील हवामान कठीण झाले आहे. राज्य सरकारने बुधवारपासून सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमधील वर्ग तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी वर्गशिक्षण स्थगित राहील. येत्या चार-पाच दिवसांत राज्यभरात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.