आपल्या मनोरंजनासाठी कोणत्याही प्राण्याला पिंज-यात कैद करुन ठेवणे चुकीचे. पण प्रत्येक देशात याकडे दुर्लक्ष करत प्राणी पक्षी संग्रहालये उभारण्यात आली आहेत. बरं त्या संग्रहालयात त्या प्राण्यांची काळजी घेतली जात असेल तर उत्तम आहे पण प्राण्यांच्या खाण्यापिण्यापासून ते त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असेल तर असे संग्रहालय बंद होणे केव्हाही उत्तम. म्हणूनच सोशल मीडियावर सध्या इंडोनेशियामधले बँनडंग प्राणी संग्रहालय बंद करण्यासाठी ऑनलाइन याचिका दाखल केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : अबब! पर्यटकांसमोर आली अजस्त्र मगर

जगातील सगळ्यात वाईट प्राणी संग्रहालयात इंडोनेशियामधल्या बँनडंग संग्रहालयाचा समावेश आहे. येथे प्राण्याच्या जेवणाचे सोडा पण स्वच्छतेकडेही साफ दुर्लक्ष केले जाते. यातच या प्राणी संग्रहालयातला एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एरव्ही अन्नासाठी कोणापुढेही हात न परसवणारे या संग्रहालयातील अस्वल अन्नसाठी पर्यटकांकडे विनवणी करताना दिसत आहे. या पर्यटकांकडूनही त्यांना जंक फूड दिले जात आहे. या प्राणी संग्रहालयातील कर्मचा-यांकडून या अस्वलांना पुरेसे अन्न दिले जात नाही. तर काही अस्वल हे तब्येतीनेही अत्यंत दुबळे झाले असून त्यांच्या अंगावरील केसही झडलेले दिसत आहेत. अत्यंत दययनीय अवस्थेत असणारी ही अस्वले अन्नासाठी पर्यटकांकडे केवीलवाणी होऊन याचना करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी ‘स्कॉर्पियन वाईल्डलाईफ ट्रेड मॉनिटरिंग ग्रुप’ने या संग्रहालयातला व्हिडिओ काढला होता. याने या संग्रहालयातील दुर्दशा सोशल मीडियाच्या माध्यामातून समोर आणली होती. त्यामुळे हे संग्रहालय बंद करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. आशियामध्ये आढळणारी सन बिअर प्रजातींची अनेक अस्वले या संग्रहालयात आहेत. आधीच ही प्रजाती धोक्यात सापडली आहे. त्यातूनही या संग्रहालयात असणा-या या अस्वलांची काळजीही घेण्यात येत नाही.