फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने विजय मिळवला. हा सामना रोमांचक होता. लिओनेल मेस्सीचं अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीसतोड खेळ झाला पण शेवटी अर्जेंटिनाने विजय मिळवला. या विजयावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोठमोठे उद्योगपती, सेलिब्रेटी या विजयाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. यातच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.
सुंदर पिचाई यांनी ट्वीट करत या विजयाचे कौतुक करत अर्जेंटिनाचे कौतुक केले आहे. यासह त्यांनी आणखी एक ट्विट करत मॅचदरम्यान गुगलवर सर्च होणाऱ्या गोष्टीबाबत माहिती दिली आहे. ‘गेल्या २५ वर्षातील सर्वाधिक सर्च ट्रॅफिक गुगलवर या मॅचदरम्यान होते. याचा अर्थ संपूर्ण जग एकच गोष्ट सर्च करत होते’ असे ट्विट सुंदर पिचाई यांनी केले आहे.
आणखी वाचा: सैनिकाला पाहताच या तरुणाने केले असे काही की…; पाहा Viral Video
सुंदर पिचाई यांचे ट्वीट:
सुंदर पिचाई यांच्या ट्वीटवरून जगभरात या खेळाची असणारी आवड स्पष्ट होत आहे.