नावात काय आहे असं म्हणतात…पण जर नाव सनी लिओनी असेल तर खूप काही आहे असंच म्हणावं लागेल. कारण बिहारमधील सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता पदासाठी आलेल्या अर्जांमध्ये सनी लिओनीने टॉप केलं आहे. आता ही सनी लिओनी जी आपल्या सर्वांना माहिती आहे की तिच आहे का काय ? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. मात्र या अर्जामुळे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग मात्र चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने १५ ते ३१जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याची अट आहे. जवळपास १७ हजार इच्छुकांनी या पदासाठी अर्ज केला असून यामधील एक नाव सनी लिओनी आहे. सनी लिओनीचं नाव आल्याने अधिकाऱ्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आता खरोखरच सनी लिओनी नाव असणाऱ्या तरुणीने अर्ज केला आहे की, टाइमपास करण्यासाठी अर्ज भरला आहे याची खात्री अद्याप होऊ शकलेली नाही. अर्जदाराने आपल्याला ९८.५ टक्के गुण मिळाल्याचा दावा केला आहे.

सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे संयुक्त सचिव (व्यवस्थापन) अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला सनी लिओनी नावाने एक अर्ज मिळाला आहे. वडिलांचे नाव लिओना लिओनी सांगण्यात आलं असून जन्मतारीख १३ मे १९९१ आहे. तरुणीने ९८.५ टक्क्यांसहित डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंग केल्याची माहिती दिली आहे. हा अर्ज खरा आहे की खोटा याची खात्री झालेली नाही. प्रमाणपत्र आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच हे स्पष्ट होऊ शकेल’.