अभिनेत्री सनी लिओनीचा ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्यावर आधारीत एक नवा म्युझिक व्हिडीओ नुकताच लाँच झाला. यूट्यूबवर लाँच झालेल्या या व्हिडीओनं अवघ्या काही दिवसांतच ९ कोटींहून जास्त व्यूज मिळवले आहेत. त्यासोबतच सनी लिओनीच्या चाहत्यांनी तब्बल २ लाख १२ हजार लाईक्स या व्हिडीओला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नेटिझन्समध्ये या व्हिडीओची आणि नव्या गाण्याची भुरळ पडल्याचं दिसत असताना या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. थेट मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्यावरून अभिनेत्री सनी लिओनी, म्युझिक व्हिडिओचे निर्माते साकीब तोशी आणि सारेगामा म्युझिकला गंभीर इशारा दिला आहे.

मूळ ‘मधुबन में राधिका’ गाणं १९६० सालातलं!

‘मधुबन में राधिका’ हे मूल गाणं मोहम्मद रफी यांनी १९६० सालात कोहिनूर या सिनेमासाठी गायलं होतं. त्यानंतर आता गायिका कनिका कपूर आणि गायक अरिंदम चक्रवर्ती यांनी या गाण्याचं रिमेक सारेगामा म्युझिक आणि साकीब तोशी यांच्यासाठी गायलं आहे. हे गाणं अभिनेत्री सनी लिओनी हिच्यावर चित्रीत करण्यात आलं असून २२ डिसेंबर रोजी ते यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. त्यानंतर काही नेटिझन्सनी देखील या गाण्यावर आक्षेप घेतला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

“..तर कायदेशीर कारवाई करेन”

हे गाणं रिलीज झाल्यानंतर यूट्यूबवर कोट्यवधींनी व्यूज घेत असताना मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “काही लोक सातत्याने हिंदू भावनांचा अनादर करत आहेत. भारतात राधेची मंदिरं आहेत. आपण तिची पूजा करतो. साकिब तोशी यांनी त्यांच्या धर्माबाबत गाणी बनवावी, पण अशी गाणी आमच्या भावना दुखावतात. जर हा व्हिडीओ येत्या तीन दिवसांत काढून टाकण्यात आला नाही, तर मी सनी लिओनी आणि तोशी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करेन”, असं नरोत्तम मिश्रा म्हणाले आहेत.

मथुरा, वृंदावनमधून आक्षेप

दरम्यान, नुकतीच मथुरेतील एका पुजाऱ्यांनी देखील या व्हिडीओवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. “सरकारने सदर अभिनेत्रीविरोधात कारवाई केली नाही आणि तिच्या व्हिडिओवर बंदी घातली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ”, असा इशारा वृंदावनमधील संत नवल गिरी महाराज यांनी दिला आहे.

अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी देखील सनी लिओनीच्या व्हिडीओमधील डान्सवर आक्षेप घेतला आहे. “हे गाणं आक्षेपार्ह पद्धतीने सादर करून सनी लिओनीने ब्रिजभूमीच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे”, असं ते म्हणाले आहेत.

Story img Loader