Viral video: सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, अशाच काही गृहिणींच्या डान्स व्हिडीओची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात काही आनंदाचे, मौजमजेचे क्षण घालवण्याची इच्छा प्रत्येकाची असते, मग ती स्त्री असो वा पुरुष. पुरुषांसाठी कधीकधी स्वतःसाठी वेळ शोधणं सोपं असतं, ते त्यांच्या मित्रांसह कुठेतरी बाहेर जाऊ शकतात. अनेकवेळा ऑफिसच्या कामामुळे दौऱ्यावर जाण्याची शक्यता असते. घरीही, कामावरून आल्यानंतर त्यांना एकटाच नो-डिस्टर्बन्स झोन मिळतो. पण महिलांच्या बाबतीत अशाप्रकारे स्वत:साठी वेळ काढणं फार कठीण असतं. कारण कुटुंब, करिअर आणि सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. अशातच चाळीतल्या या गृहिणींनी स्वत:ला जे आवडत ते करण्यासाठी दिवसातून वेळ काढायचं ठरवलं आणि आपला छंद जपला.

‘मी चार दिवस नसले तर घराचा पार उकीरडा होऊन जातो. मी नसले तर काय होईल या माणसांचं!’ असं बायका कधी रागानं म्हणतात कधी प्रेमानं. चार दिवस सोडा एक दिवस मैत्रिणींचं गेट टूगेदर करायचं तर मुलांच्या शाळा ते घरातलं काम ते सासूसासऱ्यांना डॉक्टरकडे नेणे ते ऑफिसात मिटिंग अशी एका ना अनेक कारणं सांगतात. ती कारणं खोटी नसतात पण एवढं सगळं करुन स्वत:साठी आपण जगलोच नाही अशी भावना घेऊन जगतात. रडतात-कुढतात की कुणाला आपली कदरच नाही. मात्र तरीही सगळा संसाराचा गाडा स्वत: एकटीनं ओढायचा प्रयत्न करतात. अशातच जर तिने थोडा वेळ स्वत:ला दिला तर ती आनंदाने सर्व जवाबदाऱ्या पार पाडत आनंदाने जगू शकते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महिलांनी “त्या नटीनं मारली मिठी मला गं त्या नटीनं मारली मिठी ” या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की, जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत. चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

स्वातंत्र्यानंतरच्या जवळजवळ सत्तर वर्षांच्या काळात भारतीयांच्या एकंदर आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यातही थोडे अधिक बदल झाले आहेत ते स्त्रियांच्या आयुष्यात. त्यांच्या साक्षरतेत वाढ झाली आहे आणि त्याचाच परिणाम त्यांच्या प्रगतीवरही झालेला आहे.