Viral Video : तुम्ही एका ठिकाणी वेगवेगळ्या किती सुपरकार पाहिल्या आहेत? एक, दोन की तीन पण सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका रांगेत अनेक सुपरकार दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक घरासमोर एक सुपरकार पार्क केली आहे. यात काही आलिशान कार आणि दुचाकी सुद्धा आहेत. हा व्हिडीओ विदेशातला नसून भारतातील एका शहरातला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोणत्या शहरातला आहे? तर हा व्हिडीओ बंगळूरूच्या एका सोसायटीमधील आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ बंगळूरूच्या शुभम गायकवाडनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.त्यानंतर supercarsclub_india या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पुन्हा शेअर करण्यात आला आणि चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सोसायटी दिसेल. या सोसायटीमध्ये प्रत्येक घरासमोर एक सुपरकार दिसेल. या सुपरकारमध्ये काही आलिशान कार दिसताहेत तर काही दुचाकी दिसताहेत. एका रांगेत अशा आलिशान सुपरकार पाहून तुम्हीही थक्क व्हाल.या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बंगळूरूच्या गोष्टी”
हेही वाचा : जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
हेही वाचा : रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या बंगळूरूमध्ये पाण्याची खूप कमतरता आहे अशात एका युजरने लिहिलेय, “काय फायदा जर पाणी नसेल तर.” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओमध्ये तुम्ही सोसायटीचा एक लहानसा भाग बघत आहात. बाकीचा ९९ टक्के भाग विरुद्ध दिशेने आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी माझे संपूर्ण आयुष्य बंगळूरुमध्ये घालवले पण असा रस्ता कुठेच पाहिला नाही. नेमका कुठे आहे?” एक युजर लिहितो, जर मला व्हिडीओमध्ये स्प्लेंडर दिसली नसती, तर माझा विश्वास बसला नसता की हा व्हिडीओ भारतातील आहे”