आजचा दिवस काही खास आहे. खास यासाठी कारण आज चंद्र पृथ्वीच्या अधिकच जवळ येणार आहे आणि असे सुंदर दृश्य पाहण्याची संधी जर तुम्ही चुकवली तर मात्र तुम्हाला २०३४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आज कार्तिक पौर्णिमा आहे आणि यादिवशी चंद्राची १४ पट आकाराची मोठी प्रतिमा पाहण्याचा दुर्मिळ योग आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे आज अगदी मोठा ‘सूपरमून’ सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवशी चंद्र  पृथ्वीच्या अधिक जवळ येणार आहे. साधरण चंद्र हा पृथ्वीपासून ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर दूर आहे पण आजच्या दिवशी हे अंतर २८ हजार किलोमीटरने  कमी होणार आहे. जवळपास ६८ वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या जवळ येत आहे. १९४८ मध्ये असे दुर्मिळ दृश्य दिसले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१६ मध्ये ‘सूपरमून’ दिसण्याचा योग तिनदा आला आहे. ऑक्टोबरमध्ये चंद्राची मोठी प्रतिमा दिसली होती. त्यानंतर आज चंद्राची मोठी प्रतिमा पाहता येणार आहे पण हा योग चुकला तर निराश होण्याची गरज नाही वर्षाअखेरीस म्हणजे १४ डिसेंबरला देखील पृथ्वीच्या जवळ आलेल्या चंद्राचे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडात आज संध्याकाळनंतर हे सुंदर दृश्य  नजरेस पडेल. २६ जानेवरी १९४८ मध्ये पृथ्वीवासियांना हा दुर्मिळ योग पाहता आला होता. साधरण आठ वाजल्यापासून हे दृश्य पाहता येणार आहे. या दिवशी चंद्राचा अधिक प्रकाश पृथ्वीवर पडतो त्यामुळे चंद्र  मोठा आणि अधिक प्रकाशमय दिसणार आहे.