Suraj Chavan Bhau Beej Celebration Video : ‘बिग बॉस मराठी 5’ सीझन संपला तरी सर्व स्पर्धक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. विशेषत: या स्पर्धेतील विजेता सूरज चव्हाणची खूप चर्चा रंगतेय. त्याच्या स्टाईलपासून ते सर्वांबरोबरच्या भेटीगाठींचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच भाऊबीजेनिमित्त सूरज चव्हाणचा त्याच्या बहिणींबरोबरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; ज्यात सूरज पहिल्यांदाच पाचही लाडक्या बहिणीबरोबर आनंदाने भाऊबीज साजरी करताना दिसतोय. यावेळी सूरजसह त्याच्या पाचही बहिणींच्या डोळ्यात आई- वडिलांच्या आठवणीने अश्रू दाटून आले. यावेळी त्यांनी आई -वडिलांबरोबर यापूर्वी कशाप्रकारे दिवाळी साजरी केली याविषयीच्या आठवणी सांगितल्या.

सूरज चव्हाणला पाच सख्ख्या बहिणी आहेत. तो अनेकदा त्याच्या पाचही बहिणींविषयी बोलताना दिसला; पण भाऊबीजेच्या निमित्ताने चाहत्यांना सूरजच्या पाचही बहिणी एकत्र पाहायल्या मिळाल्या. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सूरज त्याच्या पाचही बहिणींसह बसला आहे, त्याच्यासमोर भाऊबीजेसाठी ओवाळणीचे ताट आहे. यावेळी पाचही बहिणींनी एकेक करून त्याचे औक्षण केले आणि गोड भरवले. अशा प्रकारे यंदा सूरजने पाचही बहिणींसह मिळून भाऊबीज सणाचा आनंद घेतला.

“पाच बहिणींमुळे आईबरोबरच आहे असं वाटतंय”

यावेळी अल्ट्रा मराठी बज या वृत्तसंस्थेशी बोलताना सूरज आणि त्याच्या बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सूरज म्हणाला की, बहिणींना वेळ द्यायला जमतं नव्हतं; पण आज पाचही बहिणी आल्यात ना, तर माझी आईच बरोबर आहे, असं वाटतंय. खूप आनंद होतोय. एक वेळ अशी होती की, कपडे घ्यायला पैसे नव्हते इतकी नाजूक परिस्थिती होती.

suraj chavan bhaubeej video
सूरज चव्हाणने पाचही बहिणींबरोबर साजरी केली भाऊबीज

“आजचा हा सोन्याचा दिवस भावामुळे बघतोय”

यावेळी सूरजची मोठी बहीण म्हणाली की, दिवाळी सण किंवा फटाके असं कधी साजरं केलंच नाही. पण, त्यातल्या त्यात आई-वडील कधीच थोडं का होईना कुठले ना कुठले पदार्थ बनवून घालायची. सूरजची दुसरी एक बहीण म्हणाली की, सर्व महाराष्ट्राचा तू लाडका झाला आहेस. संपूर्ण महाराष्ट्र तुला खूप जीव लावतोय. असंच तू महाराष्ट्राचं प्रेम घेत राहा. सूरजच्या आणखी एका बहिणीने भावाविषयी कौतुकोद्गार काढले, ती म्हणाली की, पूर्वी दोन खोल्यांची झोपडी होती. आता सूरजमुळे बंगला होतोय हे पाहून छान वाटतंय. आजचा हा सोन्याचा दिवस भावामुळे बघतोय.

ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल

suraj chavan bhaubeej video
सूरज चव्हाणने पाचही बहिणींबरोबर साजरी केली भाऊबीज

दरम्यान, या व्हिडीओवरही आता अनेक जण कमेंट्स करीत सूरजचे त्याच्या बहिणींबरोबरच्या नात्याविषयी प्रेम व्यक्त करीत आहेत. एका युजरने लिहिले की, विसरू नकोस रे बाबा बहिणींना खूप गरीब आहेत त्या. दुसऱ्या युजरने लिहिले की, माणूस कितीही मोठा व्हावा; पण त्यानं आपल्या मातीशी प्रामाणिकच राहावं. तिसऱ्या एका युजरनं लिहिलं की, एवढे असूनसुद्धा त्याला आईची आठवण येतेय. कारण- प्रत्येक मुलाची अपेक्षा असते की, त्याच्या आईनं मुलाची प्रगती बघावी. म्हणून तो उदास आहे. चौथ्या युजरने लिहिले की, सर्व एकत्र येऊन खूप छान परिवार दिसतोय.

Story img Loader