सध्या देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीय. लोकं वेगवेगळ्या प्रकारे नवरात्री उत्सव साजरी करत आहेत. अशातच गुजरातच्या सुरतमध्ये नवरात्रीच्या या सणात काहीतरी वेगळं पाहायला मिळालाय. शहरातील पूना गाव परिसरात महिला, पुरुष आणि मुलांनी महागाईविरोधात गरबा खेळला आहे. यात महिला आणि पुरुष मंडळींनी डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन गरबा खेळत होते, तर मुले बाटलीत डिझेल पेट्रोल घेऊन गरबा खेळत होते.

देशातील महागाईमुळे आज प्रत्येकजण त्रस्त आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे डिझेल/पेट्रोलचे दर आणि गॅस सिलिंडरच्या किंमतीने प्रत्येकाच्या आयुष्याचे घरगुती बजेट बदलले आहे. सुरतच्या पूना गाव परिसरातील सत्यनारायण सोसायटीची ही छायाचित्रे आहेत. हे पाहून आपण समजू शकतो की महागाईमुळे लोकं किती प्रमाणात त्रासले गेले आहेत. हेच कारण आहे की नवरात्रीसारख्या पवित्र सणाला सामान्य गरबा खेळून आईची पूजा करण्याऐवजी लोकं वाढत्या महागाईच्या विरोधात गरबा खेळत आहेत.

गरब्यात संदेश देण्याचा केला प्रयत्न

गरबा खेळणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या डोक्यावर तेलाचा डब्बा ठेवला आहे आणि काहीजणांनी डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन गरबा खेळला आहे. तर काही महिलांनी हातात तवा आणि लाटन घेऊन गरबा खेळत आहेत. अनेक लोकांनी बाटलीत डिझेल-पेट्रोल घेऊन गरबा खेळला आहे. असा अनोखा गरबा तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल.

यावेळी सुरतमध्ये महागाई विरोधात अनोखा गरबा खेळणाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी नवरात्रीच्या दरम्यान जे गॅस सिलेंडर घेऊन एक अनोखा रास रचला आहे. पण हा एक अनोखा रास गरबा नाहीये. कारण यात जागतिक महामारी आणि वाढती महागाई रोखण्यासाठी त्याचा हा एक अभियान आहे. यात त्यांनी वाढणारी ही महागाई थांबली पाहिजे याकरिता हा गरबा खेळून सोशल मीडियाद्वारे त्यांच्याकडून सरकारला एकच संदेश देण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सामान्य लोकांना सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. सरकार फक्त म्हणते पण प्रत्यक्षात सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. असे देखील यावेळी लोकांनी संगितले.

यात आणखी एका महिलेंनी मत व्यक्त करत संगितले की, ”आम्हाला सरकारला सांगायचे आहे की महागाई वाढत आहे. आम्ही सिलेंडरचा वजन उचलत नाही, तर आम्ही वाढलेल्या महागाईचा वजन उचलत आहोत. त्यात ही महागाई बस झाली. आता आणखीन या महागाईच वजन उचलू शकत नाही.” तसेच या गरबा खेळत असलेल्यांनी संगितले की, आम्ही गॅस सिलेंडर, तेलाचा डबा, पिठाचा डबा, पेट्रोल घेऊन रास गरबा खेळलो आहोत कारण या सर्वांचे भाव सध्या खूप महाग झाले आहे. लोकांना जागरूक केले पाहिजे की त्यांनी थोडा निषेध केला पाहिजे. तसेच ज्यांना महागाईमुळे अडचणी येत आहेत, त्यांनी सरकारला संदेश दिला पाहिजे की महागाई कमी झाली पाहिजे.

असा अनोख्या पद्धतीने गरबा खेळत सरकारला संदेश देण्याचा पर्यंत यावेळी या लोकांनी केला आहे.

Story img Loader