Surat Man Designs Sarees With Lord Ram, Ayodhya Temple: अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त केवळ अयोध्या नगरीतच नाही, तर देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक भक्त भगवान श्रीरामाच्या स्वागतासाठी आपापल्या परीने तयारी करीत आहेत. सोहळ्यासाठी कुठे लाखो लाडू बनवण्याची तयारी सुरू आहे; तर कुठे सर्वांत मोठी सुवासिक अगरबत्ती अयोध्या नगरीत पोहोचवली जात आहे. त्यात आता कोट्यवधींचे उलाढाल करणारे देशातील सर्वांत मोठे कपडा मार्केट असलेले सुरत मार्केटही मागे नाही. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुरतमध्ये एक अतिशय खास साडी तयार केली जात आहे; ज्यातून फॅशन आणि भक्तीचा एक मिलाफ पाहायला मिळतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुरतमधील एका साडी व्यापाऱ्याने चक्क साडीवरच भगवान श्रीराम आणि अयोध्येतील राम मंदिराचे डिझाईन प्रिंट केले आहे. या खास साडीने सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता ग्राहकांकडून तिला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागणार आहे.

रेल्वेस्थानकावरील वडापावसह इतर खाद्यपदार्थ आवडीने खाताय? मग ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहाच

श्रीराम, माता सीता, अयोध्या मंदिराचे चित्र असलेली केवळ एकच नाही, तर शेकडो साड्या सुरतमध्ये तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात या साड्या आकर्षणाचा भाग ठरू शकतात. सध्या या साड्यांच्या प्रिंटिंगचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अयोध्येतील दुकानांमध्ये आणि भारतातील इतर शहरांमध्ये या साड्या विक्रीसाठी पाठवल्या जाणार आहेत.