कोरोनानंतर वैद्यकीय क्षेत्र अधिक आधुनिक झालं आहे. या क्षेत्रातील माणसांच्या विचारापलीकडील नविनतम प्रयोग आश्चर्यचकीत करणारे आहेत. असंच एक आश्चर्य फ्रान्समधील एका महिला रूग्णाबद्दल दिसून आलंय. फ्रान्समधील शल्यचिकित्सकांनी एका महिलेच्या हातावर यशस्वीरित्या नाक वाढवलं ​​आणि चेहऱ्यावर प्रत्यारोपण केलं. काय विश्वास बसत नाहीये ना? मात्र, हे खरं आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग यशस्वी झाल्याचं बोललं जातंय. काय होता हा आश्चर्यचकीत करणारा प्रयोग? चला तर जाणून घ्या याबाबतची संपूर्ण माहिती सविस्तरपणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रूग्णाची अडचण नेमकी काय होती ?

फ्रान्समधील टूलूस येथे एका महिलेला कर्करोग आढळून आला. या महिलेने २०१३ मध्ये अनुनासिक पोकळीच्या कर्करोगावर रेडिओथेरपी आणि केमोथेरपीने उपचार केल्यावर तिच्या नाकाचा एक भाग गमावला. त्यानंतर त्यावर अनेक उपचार केले गेले. मात्र, त्यात नाकावर उपचार करण्यात डॉक्टर अयशस्वी ठरले. अनेक वर्षे ती महिला अवयवाशिवाय जगली. मात्र, काही वर्षानंतर त्यावर डॉक्टरांनी उपाय शोधलाच.

आणखी वाचा : १८ फुटाच्या अजगराने एका दमात गिळली ५ फुटाची मगर; नंतर अशी हालत झाली की…; Viral Video पाहून उडेल थरकाप

डॉक्टरांनी केला ‘हा’ नविन प्रयोग !

डॉक्टरांनी यावर जोरकस प्रयत्न केले. इव्हनिंग स्टँडर्डनुसार, कूर्चा बदलण्यासाठी थ्रीडी मुद्रित बायोमटेरियलपासून बनवलेले एक सानुकूल नाक तिच्यासाठी बनवले गेले आणि नंतर तिच्या हातावर रोपण केले गेले. त्यानंतर डॉक्टरांनी बदली नाक झाकण्यासाठी तिच्याच कातडीचा वापर केला. उपांग दोन महिने वाढू दिले आणि त्यानंतर त्या महिलेच्या चेहऱ्यावर यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रयोगावर डॉक्टर बारिक लक्ष ठेऊन होते. हा प्रयोग अनुनासिक भागात प्रत्यारोपित केले जाऊ शकते आणि रक्तवाहिन्यांच्या ऍनास्टोमोसेसद्वारे सूक्ष्म-शस्त्रक्रिया वापरून यशस्वीपणे पुनर्वस्कुलरीकरण केले जाऊ शकते. हे त्यांच्या लक्षात आलं.

‘हे’ तंत्र ठरलं डॉक्टरांना फायदेशीर

इव्हनिंग स्टँडर्डनुसार, डॉक्टरांनी मायक्रोसर्जरी वापरली आणि हाताच्या त्वचेतील रक्तवाहिन्या महिलेच्या चेहऱ्याच्या रक्तवाहिन्यांशी जोडल्या. त्यानंतर दहा दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणि तीन आठवड्यांच्या अँटीबायोटिक्सनंतर, रुग्णाची प्रकृती चांगली झाली. डॉक्टरांनी सांगितले की,अशा प्रकारची पुनर्रचना यापूर्वी कधीही अशा नाजूक जागेवर केली गेली नव्हती. मात्र, आमच्या या प्रयोगानं ते शक्य झालं आहे. अशा प्रकारच्या प्रयोगात बेल्जियन उत्पादक कंपनी सेरहम या वैद्यकीय पथकाने केलेल्या सहकार्याबद्दल डॉक्टरांनी आभार देखील मानले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surgeons in france grew a nose on a body and then surgically attached it to the mouth pdb
Show comments