भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं आजच्याच दिवशी २०१९ साली दिल्लीमधील एम्स रुग्णालयात कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं होतं. आज सुषमा स्वराज यांची ६९ वी पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी स्वराज यांना रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अगदी संध्याकाळपर्यंत त्या लोकसभेच्या कामकाजावर लक्ष ठेऊन होत्या हे त्यांनी केलेल्या शेवटच्या ट्विटमधून दिसून येत होतं. स्वराज या परराष्ट्रखात्याच्या मंत्री असताना ट्विटवरुन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या लोकप्रिय होत्या. जगभरातील भारतीयांनी त्यांना टॅग करुन केलेल्या ट्विटवर त्या उत्तर देत असतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडिया योजना सुरु केली. मात्र त्याआधीपासूनच मोदींच्या मंत्री मंडळातील दोन खाती आणि त्या खात्यांचे मंत्री ट्विटवरुन लोकांच्या समस्या सोडवतानाचं चित्र २०१९ पर्यंत दिसून आलं. यामधील पहिले नाव म्हणजे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि दुसरे नाव म्हणजे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज. स्वराज यांचे ट्विटर हॅण्डल टॅग करुन अनेकदा परदेशातील भारतीय त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिजासंदर्भातील विचारणा करत. स्वराजही अगदी आवर्जून त्यांच्या ट्विटला उत्तर देत. अनेकदा स्वराज या स्थानिक भारतीय दुतावासाचे ट्विटर हॅण्डल टॅग करुन संबंधित व्यक्तीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गा लावण्याच्या सुचना करत. ही पाहा स्वराज यांच्या ट्विटवरील मदतीची दहा उदाहरणे…

१)
इराकमधून १६८ भारतीयांची सुटका
एका व्यक्तीने २४ जानेवारी रोजी इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांचा व्हिडिओ स्वराज यांना टॅग करुन ट्विट केला. स्वराज यांनी १९ फेब्रुवारीला हे उत्तर दिले

२)
एका व्यक्तीच्या भावाला दोहा विमानतळावरुन सुखरुप सोडवले

३)
युएईमधून तरुणीची सुटका

४)
येमेनमधून भारतीय महिलेला तिच्या आठ महिन्याच्या बाळासहीत सोडवले

५)

बर्लिनमध्ये जेव्हा भारतीय तरुणीचा पासपोर्ट आणि पैसे हरवले

६)
एव्हरेस्टवर अडकलेल्या १५ भारतीयांची सुटका

७)
दक्षिण आफ्रिकेतील भारतीय महिलेची सुटका

८)
ऋषिकेशमध्ये हरवलेल्या डच महिलेची सुटका

९)
शहिद झालेल्या सैनिकाच्या भावाला मदत

१०)
बालीमधील अपघातग्रस्त महिलेला मदत

स्वराज यांच्या याच ट्विटरवरील तातडीच्या मदतीमुळे अनिवासी भारतीयांचा मोदी सरकारवरील विश्वास वाढण्यास मदत झाली. जगभरातील भारतीयांमध्ये आमच्या समस्या ऐकणारं कोणीतरी आहे ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट आमचे म्हणणे मांडू शकतो असा विश्वास निर्माण होण्यास मदत झाली. केवळ मदतच नाही तर अनेकदा स्वराज या ट्विटवरुन आपल्या चाहत्यांना मजेदार उत्तरेही देत असतं. ट्विटरवरुन प्रश्न सुटू शकतात असा विश्वास स्वराज यांनी भारतीय नेटकऱ्यांमध्ये निर्माण केला. त्यामुळेच स्वराज या कायमच त्यांच्या या आगळ्यावेगळ्या शैलीसाठी भारतीयांच्या आठवणीमध्ये राहतील.

Story img Loader