परारष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शिकागोत राहणा-या भारतीयाला फक्त वीस मिनीटांत व्हिसा मिळवून दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आपल्याकडे मदत मागणा-या कोणालाच स्वराज नाराज करत नाहीत. त्यातून ट्विटरवर आलेल्या याचकाला स्वराज त्वरित उत्तर देतात. गेल्या वर्षभरात त्यांनी अशा कित्येकांच्या समस्या सोडवल्या आहेत.

वाचा : हजार किलोमीटरची पायपीट करणा-या ‘त्या’ भारतीयाला स्वराज आणणार मायदेशी

वाचा : ट्विटरवर ब्लॉक केलेल्या तरुणीला कौशल स्वराज यांनी दिले हटके उत्तर

शिकागोत राहणा-या रोहन शहा यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याला भारतात परतायचे होते. इतक्या कमी काळात व्हिसा मिळणे अशक्य होते. पण स्वराज आपल्याला नक्की मदत करतील हे त्याला ठाऊक होते. त्यामुळे त्याने ट्विट करत स्वराज यांच्याकडे मदत मागितली. स्वराज यांनी देखील लगेचच त्याला मदत मिळेल असे आश्वासन दिले. रोहन आणि त्यांच्या छोट्या मुलांना फक्त वीस मिनिटांत व्हिसा मिळाला.
सुषमा स्वराज यांनी अनेकांना मदत केली आहे. काही दिवसांपूर्वी तर इजिप्तमधल्या लठ्ठ महिलेला उपचारांसाठी भारतात आणण्यासाठी स्वराज यांनी मदत केली होती. एका डॉक्टरने स्वराज यांना ट्विट करत याची माहिती दिली होती. त्याला उत्तर देत तातडीने तिला शस्त्रक्रियेसाठी वैद्यकिय व्हिसा देण्याची तयारी स्वराज यांनी दर्शवली होती. तसेच भारतात परतण्यासाठी १ हजार किलोमीटरची पायपीट करणा-या जगन्नाथन सेल्वाराजन यांना देखील दुबईतून भारतात परत आणण्यासाठी त्यांनी मदत केली होती.

वाचा : जगातील लठ्ठ महिलेला भारतात आणायचे कसे?

Story img Loader