भारतात परतण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून १ हजार किलोमीटरची पायपीट करणा-या जगन्नाथन सेल्वराजन यांच्या मेहनतीला अखेर यश आले आहेत. परराष्ट्रमंत्री लवकरच त्यांना मायदेशी परत आणणार आहे. स्वराज यांनी मंगळवारी सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगन्नाथन सेल्वाराजन दुबईत कामानिमित्त गेले होते. त्यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. यासाठी त्यांना भारतात परतायचे होते. परंतु दुबईच्या श्रमिक कामगार न्यायालयाने त्यांना भारतात जाण्याची परवानगी नाकारली. सेल्वाराजन हे ४८ वर्षांचे असून तामिळनाडुमधल्या तिरुचिरापल्लीचे येथील ते निवासी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात हा खटला सुरू आहे. ते दुबईतल्या सोनापूर येथे राहतात. या भागातून त्यांना दरवेळी दुस-या जिल्ह्यात असणा-या न्यायालयात पायी चालत जावे लागते. त्यांच्या राहत्या घरापासून ही जागा ५४ किलोमीटर दूर आहे. त्यामुळे, ते दरदिवशी पाच तास पायी प्रवास करून न्यायालयात सुवानणीसाठी हजेरी लावतात. त्यांना महिन्यातून किमान दोनदा तरी या ठिकाणी फक्त २० मिनिटांसाठी हजेरी लावाली लागते. यासाठी ते पहाटे चार वाजता घरातून निघतात. बस किंवा गाडी भाडे देण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे, वाळवंटातून चालत या ठिकाणी ते येतात. पैसे नसल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते दुबईतल्या एका सार्वजनिक पार्कमध्ये राहत असल्याची बातमी दुबईतल्या ‘खलिज टाईम्सने’ जगासमोर आणली होती.

त्यानंतर भारतातल्या अनेक वृत्तपत्रांनी त्याची बातमी जगासमोर आणली. जगन्नाथनच्या त्रासाची दखल स्वराज यांनी घेतली असून त्यांना लवकरच भारतात आणले जाईल असे स्वराज यांनी ट्विट करत सांगितले. मंगळवारी सकाळी त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुषमा स्वराज यांनी दुबईमध्ये असणा-या भारतीय दुतावासाला फोन करून या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले होते. त्यामुळे लवकरच सेल्वराजन हे भारतात आपल्या गावी परतणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma swaraj tweeted jagannathan selvaraj soon brought to india