अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावरुन आपल्या नात्याची कबुली दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून देशाबाहेर असणारे आणि आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असणारे ललित मोदी आणि सुष्मिता रिलेशनमध्ये असल्याचा मुद्दा सोशल मीडियावरही फारच चर्चेत आहे. त्यातही ललित मोदींचं अडनाव, त्यांचं देशाबाहेर असणं यासारख्या गोष्टींबरोबरच जुन्या ट्विटवरुनही सोशल मीडियावर चर्चांबरोबरच मिम्सलाचाही पाऊस पडलाय. अशाच एका उद्योजकाने केलेलं एक उपहासात्मक ट्वीटही तुफान चर्चेत आहे.

नक्की वाचा >> CM टू सेम…!!! एकनाथ शिंदेंसारखाच दिसतो ‘हा’ उद्योगपती; स्वत: फोटो शेअर करत म्हणाला, ‘सॉरी’ आणि ‘जय महाराष्ट्र’

 उद्योगपती हर्ष गोयंका हे त्यांच्या मजेदार आणि तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण ट्विट्ससाठी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या नात्यासंदर्भात एक भन्नाट ट्विट केलं आहे. हर्ष आपल्या उपरोधिक ट्विटमध्ये म्हणतात, “मी ललितला फोन केला आणि विचारलं की तुला हे कसं जमलं? तो मला ‘सेन’सेशनल उत्तर देत म्हणाला, “मोदी है तो मुमकिन है.” हर्ष गोयंका यांचं हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad pawar mocks Amit Shah And Said this About him
Sharad Pawar : शरद पवारांनी उडवली अमित शाह यांची खिल्ली! म्हणाले, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”

नक्की पाहा >> “माझ्याकडे पाहून लोकांना आम्ही माणसं खातो की काय असा संशय आला”; भाजपा आमदाराच्या भाषणाचा Video Viral

हर्ष यांच्या या ट्वीटवर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेपटू किर्ती आझाद यांनी रिप्लाय केला. “सुष्मिताचं काय होणार हे तर ठाऊक नाही. मात्र भारताचं जे काही होत आहे त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे,” असं किर्ती यांनी ट्वीट केलं. त्यावरही हर्ष यांनी एक भन्नाट रिप्लाय करत, “मोदींनी यंदा बंगालवर विजय मिळवला,” असं म्हटलं. या ट्वीटमधून हर्ष यांनी सुष्मिता बंगाली असून मोदी यांच्या प्रेमात असल्याचं सूचक वक्तव्य करतानाच राजकीय पार्श्वभूमीवरही पश्चिम बंगालमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या तृणमूलच्या नेत्याला हा अराजकीय असा रिप्लाय केला.

नक्की वाचा >> ‘झाडी, डोंगार, हाटील’ने सारेच झाले इम्प्रेस पण शहाजीबापूंनी घरात पाऊल ठेवताच पत्नी म्हणाली, “काय ते बोलून राहीला डोंगार बिंगार, नीट…”

हर्ष यांचं ही ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी त्यांच्या या शाब्दिक कौशल्याला रिप्लायमधून दाद दिलीय.

Story img Loader