नुकतंच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने १० गडी राखून मोठा विजय मिळवला. मोहम्मद सिराजने या सामन्यात आपल्या गोलंदाजीने सर्वांना भारावून टाकलं. सिराजने ६ गडी बाद करत श्रीलंकन खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला. सिराजच्या या खेळीचं जगभरातून कौतुक होत असून दिग्गजांकडून त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे. सामना जिंकल्यानंतर मैदानापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त मोहम्मद सिराजची चर्चा सुरु होती. दरम्यान, एक चर्चा आनंद महिंद्रा, सिराज आणि चाहत्यांमध्ये देखील रंगली. ऐतिहासिक सामना जिंकल्यानंतर सिराजला एसयुव्ही कार का दिली नाही? चाहत्यांनी थेट आनंद महिंद्राला सवाल केला. या प्रश्नावर आनंद महिंद्रा काय म्हणाले, वाचा बातमी सविस्तर…

सिराजची तुफान गोलंदाजी

आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात सिराजने आपल्या तुफानी गोलंदाजीने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. ७ षटकांच्या स्पेलमध्ये त्याने २१ धावा दिल्या आणि ६ विकेट घेतल्या. यात त्याने एकाच षटकात ४ बळी घेतले आणि समराबिक्रमा आणि दासून शनाका या दोन खेळाडूंना खाते उघडण्याची संधीही मिळाली नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ केवळ ५० धावा करू शकला. जसप्रीत बुमराहने १ आणि हार्दिक पांड्याने ३ विकेट घेतल्या.

(हे ही वाचा : जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी दिल्लीमध्ये ‘आलू टिक्की’चा घेतला आस्वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल )

ऐतिहासिक सामना जिंकला अन् चाहते म्हणाले…

भारताने हा ऐतिहासिक सामना जिंकला. आनंद महिंद्राने ट्विटवर सिराजचं कौतुक केलं. त्यावर आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या. यादरम्यान एका चाहत्याने “सर त्याला कृपया एसयुव्ही द्या,” अशी मागणी केली. त्याच्या या मागणीवर आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिलं. त्यांचं हे उत्तर ऐकून चाहते नरमले.

आनंद महिंद्रांनी दिलं ट्विटवर उत्तर

सिराजच्या चाहत्याने ट्विट करत महिंद्रा यांच्याकडे सिराजसाठी एसयुव्ही कारची मागणी केली होती. त्यावर, ऑलरेडी सिराजला कार देण्यात आलीय, असेही त्यांनी म्हटलं. २०२१ मध्ये सिराजच्या उत्कृष्ट कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवर, महिंद्रा ग्रुपने हैदराबादच्या वेगवान गोलंदाजाला थार एसयूव्ही भेट दिली होती. सिराजने थारसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याने मॅन ऑफ द मॅचची रक्कम श्रीलंकेच्या ग्राउंड स्टाफला दिली, ज्याचे खूप कौतुक होत आहे. वेगवान गोलंदाजाच्या या निर्णयाचे कौतुक करताना आनंद महिंद्रा म्हणाले की, याला क्लास म्हणतात.

Story img Loader