Viral Photo : सोशल मीडियावर अनेक पाट्या व त्यावर लिहिलेले संदेश व्हायरल होत असतात. काही संदेश पाहून हसायला येते तर काही संदेश विचार करायला भाग पाडतात. सध्या असाच एका पाटीचा फोटो व्हायरल होत आहे. या पाटीवर खूप सुंदर संदेश लिहिला आहे. हा संदेश वाचून तुम्हीही भावुक व्हाल. (Viral Suvichar Pati Photo Highlights Life Lessons : Only Situations Reveal True Friends)

पाटीवर काय लिहिलेय? जाणून घ्या

तुम्ही शाळा, दुकाने, कार्यालयात अनेकदा सुविचार पाटी पाहिली असेल. या सुविचार पाटीवर दरदिवशी अनेक सुंदर सुविचार लिहिले जातात. कधी हे सुविचार आपल्याला प्रेरणा देतात तर कधी विचार करायला भाग पाडतात. या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला एक पाटी दिसेल. ही पाटी अजब कॉर्नर येथील असून या पाटीवर विचारधन असे लिहिले आहे आणि त्याखाली सुंदर संदेश लिहिला आहे. संदेश खालील प्रमाणे – “शाळा सारं काही शिकवते. लघुकोन, काटकोन, त्रिकोन, चौकोन पण आपलं कोण हे मात्र परिस्थितीच शिकवते.” या पाटीवरील हा संदेश वाचून काही लोक भावूक होतील तर काही लोकांना त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग किंवा काळ आठवेन. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Gaurav More Hindi Film movie poster
फिल्टरपाड्याचा बच्चन हिंदी सिनेमात झळकणार! गौरव मोरेने शेअर केलं पहिलं पोस्टर; म्हणाला, “आशीर्वाद…”
Shop owner advertise poster outside shop for customers goes viral on social media
PHOTO:”कृतज्ञता आयुष्य सुंदर बनवते” दुकान मालकानं ग्राहकांसाठी लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; वाचून तुम्हीही कराल कौतुक
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Susheela Sujeet New Marathi Movie
दरवाजाच्या आड काय आहे गुपित? ‘सुशीला- सुजीत’ सिनेमाचं पोस्टर चर्चेत, पहिल्यांदाच एकत्र झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी
MLA sameer kunawar reaction on not getting place in cabinate minister
वर्धा : कोण म्हणतो मी नाराज! ‘हे’ आमदार म्हणतात, ‘मंत्री पदाची इच्छा…’

हेही वाचा : पुणेरी आजीनंतर आता पुणेरी आजोबांचा Video Viral! “काठी न घोंगड घेऊ द्या की रं” गाण्यावर आजोबांनी केला भन्नाट डान्स

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Photo )

हेही वाचा : १ ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस, आधार, पॅनसह बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम; प्रत्येकाच्या आर्थिक व्यवहारांवर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

bhaavki____007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यालाच आयुष्य म्हणतात.” तर एका युजरने लिहिलेय, “आपलं कोण हे फक्त परिस्थिती शिकवू शकते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “सांगली माळी टॉकीज जवळ आहे ही पाटी. मी रोज बघत असतो नवीन काहीतरी असते.” एक युजर लिहितो, “शाळा जे शिकवते ते पूर्णपणे शिकून तुम्ही परिस्थितीला बदलू शकता .”

काही दिवसांपूर्वी असाच एक पुणेरी पाटीचा फोटो व्हायरल झाला होता. या पाटीवर दारावरची बेल वाजवणाऱ्यांसाठी विशेष सुचना दिली होती. ही सुचना वाचून कोणीही पुन्हा दारावरची बेल वाजवणार नाही. त्या पाटीवर लिहिले होते “बेलसाठी लागणाऱ्या विजेचे पैसे आम्ही भरतो..एकदाच वाजवा” कमीत कमी शब्दांत समोरच्याचा अपमान करण्याची कला पुणेकरांकडे आहे. पुणेरी पाटी हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

Story img Loader