Swami Avimukteshwaranand Lathicharge Fact Check Video : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज सध्या सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर त्यांनी भाविकांना कुंभ क्षेत्रात कोठेही डुबकी घेण्याचे आवाहन केले होते. कुंभ मेळ्यात डुबकी घेण्यासाठी कोणतेही निश्चित असे स्थान नाही. त्यामुळे भाविकांना धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. याचदरम्यान शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यात असा दावा केला जात आहे की, प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. पण खरंच अशी कोणती घटना घडली का याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स यूजर रितेश सिंहने व्हायरल व्हिडीओ शेअर केला.

इतर युजर्सही असेच दावे करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही गुगल कीवर्ड सर्च करून तपास सुरू केला.

यामुळे आम्हाला फर्स्ट इंडिया न्यूजवर तोच व्हिडीओ मिळाला, ज्यात पोलीस संतांवर लाठीचार्ज करताना दिसत होते. व्हिडीओमध्ये स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजही होते.

Swami Avimukteshwaranand lathicharge fact check
स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाकुंभ मेळा फॅक्ट चेक (फोटो – x)

व्हिडीओचे शीर्षक होते : वाराणसीमध्ये पोलिसांनी संतांवर लाठीचार्ज केला, जो नऊ वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

वर्णनात म्हटले आहे : गंगा नदीत गणेश विसर्जनाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू झाला. लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. चेंगराचेंगरीदरम्यान चौकात गोंधळ उडाला. लाठीचार्जमध्ये १५ हून अधिक लोक जखमी झाले. पोलीस आणि पीएसीने सुरुवातीला लोकांना चौक खाली करण्याचा इशारा दिला होता; पण लोक विरोधात घोषणाबाजी करू लागले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २५ लोकांना अटक केली.

आम्हाला २०२१ चे रिपोर्ट्सही मिळाले, ज्यात अखिलेश यादव यांनी संतांवर लाठीचार्ज केल्याबद्दल शंकराचार्यांची माफी मागितली होती.

https://www.dailypioneer.com/2021/state-editions/akhilesh-apologises-to–seers-for-lathi-charge–in-varanasi-in-2015.html

आम्हाला या घटनेचे अनेक व्हिडीओ रिपोर्ट्स मिळाले.

Swami Avimukteshwaranand lathicharge fact check
स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाकुंभ मेळा फॅक्ट चेक (फोटो – x)

२०१५ मध्ये वाराणसीमध्ये पोलिसांनी भगवान गणेशाच्या मूर्तींचे गंगा नदीत विसर्जन करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. लाठीचार्जमध्ये स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि इतर अनेक धार्मिक नेते जखमी झाले होते. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना अटक करून तुरुंगातही पाठविण्यात आले होते.

निष्कर्ष :

स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि इतर अनेक धार्मिक नेत्यांवर २०१५ मध्ये वाराणसीमध्ये झालेल्या लाठीचार्जचा व्हिडीओ प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यातील सध्याचा असल्याचे सांगून शेअर केला जात आहे. परंतु, व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader